----------------------------
चाळीसगाव-:तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील सोमनाथ शामराव माळी सामाजिक,शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल महाराष्ट्र् शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरिय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे व ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक कै.आण्णासाहेब बाबूलाल देवचंद पगार याचे स्मरणार्थ दि.२७/ १२/ २०१९ रोजीजळगाव येथील जि.प.च्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात झालेल्या राज्यस्तरिय पर्यावरण परिषदेत *राज्यस्तरिय पर्यावरण रत्न* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी जळगाव चे आमदार राजूमामा भोळे,नेहरु युवा केद्राचे संचालक अतुलजी निकम,निसर्ग मित्र समिती संस्थापक प्रेमकुमार अहिरे व मान्यवरांचे हस्ते सन्मानपत्र,शाल,पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी निसर्ग मित्र समिती धुळेचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे,पदाधिकारी, ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिकचे सरचिटणीस रमेश आप्पा पगार व पदाधिकारी, व पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
