अमळनेर येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्या प्राधिकरण ) पुणे व युनिसेफ , महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमांतर्गत सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्यानुसार तज्ञ मार्गदर्शक म्हणून एस. पी. अहिरे मॅडम यांनी सर्व उपस्थित शालेय विध्यार्थिनींना आपली मासिक पाळी आणि आरोग्य याविषयी मार्गदर्शन करतांना विशद केले की मासिक पाळी ही नियमितपणे सुरू राहणे म्हणजे आपले आरोग्य चांगले राहणे होय . त्याबाबतीत आपण कोणत्याही श्रद्धा आणि अंधश्रध्दा यांचा विचार करू नये . कारण मासिक पाळी ही आपल्या स्त्रीत्वाची नैसर्गिक देणगी आहे. ' जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी !, 'अगर रहेगी नारी ! तो टिकेगी दुनिया सारी ! अशी विविध उदाहरणे देऊन मुलींच्या मनातील शंकाचे समाधान केले . सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या गायत्री भदाणे उपस्थित होत्या . त्यांनीही मुलींसाठी अशा वैयक्तिक माहिती आणि आरोग्या विषयी कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करावे आणि सध्य परिस्थितीत अश्या माहितीची नितांत गरज आहे असे प्रतिपादन केले. आदर्श शिक्षिका कल्पना महंत मॅडम यांनीही सर्वांचे आभार व्यक्त करतांना मुलींसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे अभिनंदन केले . नीलिमा पाटील मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी तेसाठी परिश्रम घेतले .
