Halloween party ideas 2015


जैतपीर केंद्राची शिक्षण- संवाद परिषद (पुष्प ५वे) चौबारी येथे उत्साहात संपन्न

अध्ययन,अध्यापन प्रभावी व मनोरंजक बनवण्यासाठी दिक्षा अँप व तंत्रज्ञानाचा वापर करावा.
केंद्रप्रमुख अरूण मोरे

अमळनेर प्रतिनिधी

दि.२३/१२/२०१९ सोमवार रोजी जैतपीर केंद्राची शिक्षण संवाद परिषद (पुष्प ५वे) दे. ना.पाटील माध्य. विद्यालय चौबारी येथे संपन्न झाली. शिक्षकांनी आपले अध्ययन व अध्यापन प्रभावी, मनोरंजक व्हावे यासाठी 'दिक्षा' सारखे शासकीय अँप व तंत्रज्ञानाचा वापर करावा,असे सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री पी.पी. पाटील यांनी केले. परिषदेची सुरुवात प्रतिमा पूजन, ईशस्तवन,व स्वागत गीताने झाली.त्यानंतर १० मिनिटे सामुदायिक आनापान व मौन करुन त्याचे फायदे समजावून सांगितले.श्रीमती मंगला गायकवाड यांनी इ.५ वी भूगोल 'आपली पृथ्वी व सूर्यमाला' या घटकाचे ज्ञान रचनावाद वर आधारित शैक्ष. साहित्याचा वापर करत उत्तम नमुनापाठ सादर केला. मूल्यवर्धन या विषयावर श्री योगेश भदाणे यांनी नैतिक मूल्ये व कृती यांवर विचार मांडले.इंग्रजी पेटीतील साहित्याचा अध्यापनात घटक नुसार वापर बाबतचे मार्गदर्शन श्री. सुरेंद्रगिर गोस्वामी यांनी केले.
शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी करण्याबाबत श्री.सी.एस्. पाटील व के.एन्.पाटील यांनी  ठोकताळे,क्लूप्त्या,बारकावे यावर मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्ती व स्पर्धा परिक्षेला बसवून सराव करुन घेणे, म्हणजेच विद्यार्थ्यांना व आपल्याही बौद्धिक खुराक देण्यासारखे आहे. दिलेला गृहपाठ तपासून वेळीच चूकीची दुरुस्ती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून सर्व शिक्षकांनी तंत्रस्नेही व्हायला हवे.असे सूतोवाच केंद्रप्रमुख श्री अरुण मोरे यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून सांगितले.दरम्यान चौबारी माध्य.च्या मुलींनी 'संपूर्ण स्वच्छता अभियान' अंतर्गत जनजागृतीपर नाट्यीकरण सादर केले.श्री योगेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.शेवटी राष्ट्रगीत होवून शिक्षण परिषदेची सांगता झाली.परिषद यशस्वीतेसाठी श्री पी.एन्.पाटील,श्री एस्. एस्.पाटील,श्रीमती बी.जी. पाटील,सर्व शिक्षक,व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.