अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील संभाजी ब्रिगेड संघटनेचे /पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत रमेश निकम यांनी पदाचा राजीनामा चक्क पोस्ट कार्ड वर लिहून जिल्हाध्यक्षाना पाठवला आहे.
या संदर्भात जिल्हाध्यक्ष गणेश पाटील पाचोरा यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी राजीनामा देण्याची सबब लिहली आहे ती अशी कि मी संभाजी ब्रिगेड या पक्षात संघटना होती तेंव्हा पासून कार्यरत असून 2017 पासून माझ्या हातात पक्षाची धुरा होती. त्या सालापासून आज तागायत मी अमळनेर तालुक्यात तंन, मन आणि धन देऊन काम केले तालुक्यात ब्रिगेडच्या 22 शाखा उघडल्या बरोबर असंख्य युवा पक्षाला जोडण्याचे काम निःस्वार्थ भावनेने केले पण या बाबीची वरिष्ठ पदाधिकारी यांच्या कळून साधे कौतुक देखील केले गेले नाही याचे दुःख आहेच.
त्याच बरोबर साल -जून -2017 मध्ये आपणास प्रशाशनातील घडलेल्या भ्रष्टाचार बाबत सक्षम पत्रवेव्हार केला होता त्या बाबतीत वरिष्ठानी वेळीच दखल घेतली नाही त्या मुळे मला नाहक 2 महिने कारावस भोगावा लागला, या दरम्यान आपण माझ्या कुटुंबाची भेट देखील घेतली नाही. त्यांना धीर दिला नाही या अश्या वरिष्ट अधिकाऱ्यांच्या हलगर्जी आणि ना कर्ते पणाला कंटाळून मी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.
संपादकीय -निकम यांच्या राजकीय भूमिकेकळे असंख्य युवकांचे लक्ष लागून आहे. कोणता झेंडा हाती घेतील आता??