Halloween party ideas 2015


वाढदिवसाच्या निमित्ताने ........

सामाजिक, शैक्षणिक गायन क्षेत्रातील
कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व यांचा संगम 
ताईसाहेब वसुंधरा लांडगे
ताई आज आपला वाढदिवस! अगोदर आपले मनापासून अभिष्टचिंतन!
💐💐💐🎂🎂🎂🎂🎂
आजतागायत आपण प्रत्येक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्ववाने नेत्रदीपक प्रगतीचा आलेख गाठला आहे. त्यात आमचे नाना आपल्या मागे सावलीसारखेच नेहमी पाठशी असतात. त्यात दोन मितभाषी मुली,दोन जवाई मुले यांचाही आपल्या प्रत्येक कार्यात सपोट असतो.आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अनेक पदे आपल्याकडे चालून आले.त्यांना आपण न्याय देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला यात शंका नाही. ताई आपल्या चांगल्या कार्यामुळे आपण अनेक पुरस्काराने सन्मानित झाल्या आहेत.ताई आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास शंभर वर्षे आयुष्य मिळो.हिच गजानन महाराजांना प्रार्थना!

आमच्या वसुंधरा ताई ,दशरथ नाना परिसरात दुःख असो किंवा सुख असो लग्नकार्य असो वा उत्तर कार्य असो किंवा तत्सम दुःख असो आपले व्यक्तिगत कामे सोडून ते समाजकार्यात हजेरी लावतातच. एक आदर्श व्यक्तिमत्व संयमी संवेदनशील मनाने हळवे असलेल्या वसुंधरा ताई त्यांनी आजतागायत अनेक सत्यशोधक पद्धतीने विवाह लावण्याचे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षणाचे कैवारी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या थोर पुरुषांच्या जीवनावर त्यांनी आपले पोवाडे सादर केले आहेत आज तागायत अनेक मोठे कार्यक्रमांमध्ये त्यांचे सूत्रसंचालन एक आकर्षण असते. ताई खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त, पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक पतपेढी मध्ये खजिनदार संचालक पदापर्यंत मजल मारली आहे ,मराठी वाड्मय मंडळ, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय, अर्बन बँक ,धनगर समाज महासंघ, ओबीसी शिक्षक असोसिएशन असे अनेक पदांवर त्या कार्यरत आहेत परंतू प्रत्येक पदाला त्यांनी न्याय देऊन समाजकार्याला झोकून घेतले आहे.
ताईंनी थोर पुरुषांच्या जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या विचाराचे पूजन केले पाहीजे. त्यांचे पारायण केले पाहीजे असे नेहमी सांगत ,आणि हे सांगत असताना कार्याची सुरुवात स्वतःपासून यांनी केली आहे. माझ्या वैयक्तिक जीवनात माझ्या प्रेरणास्तोत्र म्हणून वसुंधरा ताई ,दशरथ नाना नेहमी पाठीशी असतात. त्यांच्या मार्गदर्शनाने पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाटण्यात संचालक म्हणून मला कार्याची सेवा मिळाली हे तेवढेच सत्य. माझ्या सुख दुःखात नाना व ताई खंबीरपणे उभे आहेत मला अभिमान आहे आमच्या ताईंना वाढदिवसा निमित्ताने खालील दोन ओळी
नवे क्षितीज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!💐💐💐🎂🎂🎂🎂🎂
तुमचाच भाऊ
 ईश्वर महाजन 
आणि परीवार अमळनेर
9860352960

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.