अमळनेर प्रतिनिधी
शिरुड येथे आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमांतर्गत आज ग्रामपंचायतीतर्फे बालसभे चे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी सरपंच श्री.सुपडू पाटील होते.पंधराव्या वित्त आयोगातून जि.प.शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षण व आरोग्यासाठी काय मुलभूत सुविधा करता येतील यावर बालकांची मते जाणून घेतली.इ.४थी चा लोकेश नितीन पाटील या विद्यार्थ्यांने क्रिडा साहित्य उपलब्ध करण्यासाठी सरपंचाकडे मागणी केली.बालसभेस ग्रामपंचायत सदस्य श्री.बापुराव महाजन,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री नंदलाल कुंभार, सदस्य श्री.रवी धनगर, ग्रामसेवक श्री.गुलाबराव सुर्यवंशी,श्री.वारुळे,श्री.बालू नाना व प्राथमिक व माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.