अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत इंडीया फिट मूव्हमेंट अंतर्गत आगळ्या आणि वेगळ्या अशा शालेय स्पर्धांचे उद्घाटन मुख्याध्यापक संदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आणि गुब्बारा दौड, चक्रसाखळी , बॉल पास करणे, रंगभरण, पायाने आपला फुगा वाचवुन इतरांचा फुगा फोडणे, दोघांच्या पाठीत फुगा ठेऊन सीमा रेषा पार करणे, कबड्डी, क्रिकेट आणि वन मिनिट शो साठी बिस्कीट गालावर ठेवून संगीतमय रित्या तोंडापर्यंत आणून खाणे ! अशा अतिशय मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धांचे नियोजन उपक्रमशील शिक्षक पी. एम. ठाकरे यांनी केले . आणि नवनवीन स्पर्धा कशा घ्याव्यात ही संकल्पना उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांच्या उपक्रमातून साकारण्यात आली. सदर स्पर्धेत सर्व शालेय विध्यार्थ्यांना सहभागी करून व्ही. डी. पाटील, डी. एस. कारले, पी. ए. शेलकर, आणि भारती चव्हाण मॅडम यांनी परीक्षक म्हणून आणि विध्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून मोलाची कामगिरी केली. आणि सर्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय, आणि तृतीय असे स्पर्धक निवडण्यात आले. सदर स्पर्धां नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी अशोक सैंदाने, शिवाजी पाटील, प्रमोद महाजन, राहुल पाटील, रविंद्र चौधरी यांनी परिश्रम घेतले.
