डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त ज्ञानप्रिय शरद मोरें कडून पेणजाई क्रिकेट संघास ग्रंथसंग्रहाची अनमोल भेट
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) जगातील सर्वात मोठे स्वतः च्या मालकीचे ग्रंथालय असलेल्या विश्वरत्न महामानव, बोधिसत्व परम पूज्य, थोर कायदेपंडित, भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते ज्ञानप्रिय आणि दानशूर व्यक्तीमत्व असलेल्या शरद मोरे यांनी डॉ. आंबेडकर भवन दादर येथे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याच्या मौजे पेण तर्फे तळे गावातील श्री पेनजाई देवी क्रिकेट संघ येथील सार्वजनिक वाचनालयास अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान असा ग्रंथ संग्रह संच भेट म्हणून दिला.
त्यांनी भेट दिलेल्या ग्रंथ संपदे मध्ये शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, जनरल नाॅलेज, समाजशास्त्र, राज्यशास्त्र,अर्थशास्त्र, विज्ञान, वैद्यकीय, वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी, संगणकीय ज्ञान, व्यवहारज्ञान, तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी विद्यार्थी मार्गदर्शक इत्यादी मौल्यवान आणि दुर्मिळ पुस्तकांचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित क्रिकेट संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांनी नियोजित केलेल्या पुढील सामाजिक कार्यक्रमांची कल्पना दिली. तसेच अगदी चार ते पाच वर्षांपूर्वी चे आपले शिक्षण आटोपून नोकरीला मुंबईत आलेल्या तरुणांनी आपल्या गावाबद्दल सामाजिक सेवेची आवड आणि गावच्या विकासाबद्दल चे मत लक्षात घेऊन श्री भिमराव आंबेडकर यांनी त्यांना वेळोवेळी त्यांच्या सामाजिक उपक्रमात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. भिमराव आंबेडकर आणि दानशूर ज्ञानप्रिय सामाजिक कार्यकर्ते शरद मोरे या दोघांनी क्रिकेट संघाचे यंग ब्रिगेड सोबत दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच त्यांना शिक्षणाबरोबर समाजसेवेचे महत्त्व समजावून दिले. त्यावेळी मंडळाच्या वतीने भिमराव आंबेडकर यांना क्रिकेट संघाच्या माध्यमातून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि श्री शरद मोरे साहेबांचे खूप खूप आभार मानण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता आली.
