Halloween party ideas 2015


हृदयरोगाने घेतला एकाच दिवशी माणगांव तालुक्यातील दोन व्यक्तींचा बळी : तालुक्यावर दुःखाचे सावट 
 हृदयरोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक

      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) माणगांव मध्ये एकाच दिवशी दोन व्यक्तींचा हृदयरोगाने मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजता घडल्याने संपूर्ण माणगांव तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले असून या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांत सदरच्या वाढत्या हृदयरोगा मुळे काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
        सदर घटनेची सविस्तर माहिती अशी आहे.. सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी माणगांव तालुक्यातील तिलोरे गावातील रायगड प्रेस क्लब पुरस्कृत आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. प्रमोद दळवी वय अंदाजे ५१ हे सकाळी आपल्या शेतात भेंडी काढण्यासाठी गेले असता त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. तर दुसरीकडे माणगांव पोलीस ठाण्यात गेली तीन वर्षे पोलीस हवालदार म्हणून पोलीस सेवेत असलेल्या सुनील नामदेव जाधव वय अंदाजे ५२ हे आॅनड्युटी प्रशिक्षणासाठी नाशिक येथे निघाले असता माणगांव शहरातील माणगांव बस स्थानका समोरील दत्त मंदिर येथे ते आले असता त्यांच्या छातीत अचानक दूखू लागले म्हणून त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पूर्वीच हृदयरोगाने त्यांची प्राणज्योत मावळली या दोन्ही आकस्मिक दुःखद घटनांमुळे माणगांव तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले असून संपूर्ण माणगांव तालुका शोकाकुल झाला आहे. तर दुसरीकडे हृदयरोगाचे हे वाढते प्रमाण सर्वांसाठी चिंताजनक ठरत आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.