जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे आयोजन*
पत्रकार दिन : *महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम* : नाव नोंदणीचे अवाहन
*जळगाव, (प्रतिनिधी)-* महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधत *जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवाना हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींनी हेल्मेट मिळविण्याकरिता* नाव नोंदणी करणे आवश्यक असून लवकरात लवकर आपली नाव नोंदणी मराठी पत्रकार संघाकडे करावी असे अवाहन जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे,विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हाकार्यद्यक्ष शरद कुलकर्णी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश अध्यक्ष राजा माने, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने पत्रकारांना राज्यभर हेल्मेट वाटप करण्याचा अभिनव अभियान पत्रकार संघ राबवित आहे.त्याच अनुसंघाने जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवाना पत्रकार दिना निमित्त हेल्मेट वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जिल्यातील पत्रकार बांधवानी हेल्मेट मिळविण्याकरिता नाव नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, जळगाव जिल्हा शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे. *खालील नंबर वर आपले नाव नोंदणी करा-* प्रविण सपकाळे, मो. 9021969100
किशोर रायसाकडा, - मो. 8975814555
प्रमोद सोनवणे, मो. 8600664977
शरद कुलकर्णी
मो. 9527108678
संभाजी देवरे,अमळनेर
मो.8007706009