नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आज रॅली-सभा
अमळनेर प्रतिनिधी - भारतीय संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याचे ( CAA ) स्वागत व समर्थन करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा मंच व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने स्वागत व समर्थन रॅली व सभेचे आयोजन केले आहे. आज दि.२३ डिसेंबर,सोमवार रोजी सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर चौक येथून रॅलीस सुरूवात होईल. राणी लक्ष्मीबाई चौक,सुभाष चौक,कुंटे रोड,धुळे रोड,बस स्टँड मार्गे तहसिल कार्यालय येथे रॅलीचा समारोप होईल.तरी सर्व देशभक्त नागरिकांनी या समर्थन रॅली व सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा मंच व अभाविपच्या वतीने करण्यात आले आहे.