Halloween party ideas 2015


"प्रशिक्षण व शिक्षण परिषदेत सकारात्मक दृष्टिकोणातून भाग घ्यावा." - केंद्रप्रमुख गोकुळ पाटील

अमळनेर प्रतिनिधी: दि.२०/१२/२०१९ वार- शुक्रवार रोजी अमळगाव केंद्राची शिक्षण परिषद अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ आनंदा पाटील यांचे अध्यक्षतेखाली जि.प.शाळा दोधवद, कलाली व माध्य.विद्यालय दोधवद यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथ. शाळा, गांधली-पिळोदे येथे उत्साहात संपन्न झाली. व्यासपीठावर सुरेखा पाटील, सुरेखा देसले, गोकूळ साळुंखे, दत्तात्रय सोनवणे, योगेश चौधरी व रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते.

नियोजनानुसार ईशस्तवन, स्वागतगीत व आदर्श परिपाठ जिल्हा परिषद प्राथ.शाळा,गांधली-पिळोदे येथील विद्यार्थ्यांनी सादर केला.तसेच आनापान कार्यक्रमांतर्गत ध्यान व मौन साधना याबाबत माहिती सांगून प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले.

*नमुना पाठ:-* अंतर्गत जि.प.शाळा, गांधली-पिळोदे येथील उपशिक्षिका महानंदा सूर्यवंशी यांनी ज्ञानरचनावादावर आधारीत इ.1 ली गणित विषयाचा पाठ साहित्याचा वापर करुन रंजक पध्दतीने सादर केला. ज्ञानरचनावाद पध्दतीमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग व प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता.

*प्रसंगोपात्त उपक्रम:-* गाडगेमहाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून उपशिक्षिका नुतन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली इ.3 रीच्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांच्या जीवनावर आधारीत प्रबोधनपर किर्तन "गाेपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" बाबांच्या साध्या वेशातील बालकलाकाराने प्रश्नोत्तर व संवादात्मक शैलीने सादर केले. बालकिर्तन उपस्थितांना अतिशय भावले. या बालकिर्तनास केंद्रातील सर्व शाळांतील उपस्थितांकडून भरघोस बक्षीस मिळाले.
               
*शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन:-* शिष्यवृत्ती परिक्षा तयारीबाबत सतिश पाटील यांनी गणित व बुध्दिमत्ता विषयातील भौमितिक आकृत्या, आरशातील / पाण्यातील प्रतिमा इ.वरील उदाहरणे विविध सूत्रे व क्लृप्त्यांच्या आधारे चटकन सोडवता येतील तसेच मुख्य परिक्षेपुर्वी सराव प्रश्नपत्रिकाद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा करुन घेता येईल. याबद्दलचे उदबोधन अतिशय सोप्या पध्दतीने केले. 

*इंग्रजी साहित्य पेटीबाबत मार्गदर्शन:-* इंग्रजी साहित्य पेटीतील विविध साहित्याचा वापर करुन इंग्रजीची भिती कशी घालवता येईल? तसेच साहित्य हाताळणी, वापर व उपयुक्तता याबाबत मगन चौधरी यांनी माहिती दिली.
               
*माहिती तंत्रज्ञानाचा अध्यापनातील उपयोग:-* माहिती तंत्रज्ञानाचा अध्यापनातील उपयोग तसेच ज्ञानरचनावाद याद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संकल्पना कशा स्पष्ट करुन देता येतील. गणित विषयाची भिती कशी कमी करता येईल? 100% विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवता येतील याबाबत चंद्रकांत देसले यांनी माहिती दिली.
                 
*प्रशासकीय विषयावरील मार्गदर्शन:-* NAS, PGI, U-Dise+, अध्ययन निष्पत्तीवर आधारीत प्रश्न निर्मिती, शाळासिध्दी, तंबाखूमुक्त शाळा, शिष्यवृत्ती परिक्षा व नवोदय परीक्षा याबाबत तसेच इतर प्रशासकीय विषयांवर केंद्रप्रमुख गोकूळ पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले.

शिक्षण परिषद कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रेमराज पवार व आभार प्रदर्शन रविंद्र चव्हाण यांनी केले. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी सुरेखा पाटील, रमेश पारधी, रविंद्र पाटील, अशोक मोरे, संजय शिंदे, नुतन पाटील, महानंदा सुर्यवंशी, सुनंदा सोनगीरे, संजय महाजन, गोकुळ साळुंखे, जितेंद्र शेटे, चंद्रकांत देसले, सतिष पाटील, प्रेमराज पवार, रविंद्र चव्हाण, गुलाब शिरसाठ, निता बडगुजर, भानुदास सैंदाणे, प्रशांत देसले व योगेश चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले.

✍🏻दत्तात्रय सोनवणे (9420111182)
*जि.प.उच्च प्राथ.शाळा,पिंगळवाडे*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.