महान कर्मयोगी संतश्रेष्ठ सावता माळी महाराज!क्रांतिसूर्य-महामानव महात्मा ज्योतिबा फुले!क्रांती ज्योती साध्वी सावित्रीबाई फुले!कामगार चळवळीचे आद्य जनक नारायण मेघाजी लोखंडे!दिन-दलितांचे कैवारी छत्रपती शाहू महाराज!भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार-भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर!आदि महापुरुषांना अभिवादन करतो!वंदन करतो!
सर्व माळी समाज बंधू बघिणीनो!येत्या१०नोव्हेंबर२०१९ रविवार रोजी सकाळी१०वाजता खान्देश माळी मित्र मंडळ, पिंपरी-चिंचवड-पुणे परिसर यांच्या वतीने लांडगे सभागृह,भोसरी,पुणे येथे अखिल राज्य पातळीवर माळी समाजाचा वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले आहे.
गेल्या वीस वर्षांपासून मेळावे आयोजित करून मंडळाने सातत्य राखले आहे.मंडळातर्फे आयोजित दहा नोव्हेंबरला होणारा मेळावा हा विसावा मेळावा आहे.
मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे,सर्व सदस्यांचे मनापासून योगदान लाभलेलं आहे.सर्व सदस्यांच्या स्वतःच्या खिशातून आर्थिक सहाय्य घेऊन,कुठल्याही अपेक्षेविना मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता मेळाव्यासाठी झोकून देतअसतो.
सर्व कार्यकर्ते हिच मंडळाची खरी ताकद आहे!शक्ती आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो!म्हणूनच गेल्या वीस वर्षांपासून मेळावा आयोजनाने सातत्य राखलं आहे.
येत्या वधू-वर मेळाव्याचे उदघाटक म्हणून पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे महापौर माननीय श्री राहुलदादा जाधव,
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि खान्देश भूषण श्री मुरलीधर महाजन,
प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे दुसऱ्यांदा निवडून आलेले अत्यंत कार्यक्षम आमदार मा श्री महेश दादा लांडगें,
माजी आमदार आणि महाराष्ट्र भाजपा युवा प्रदेश अध्यक्ष मा श्री योगेश आण्णा टिळेकर,
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे उप-महापौर श्री सचिनदादा चिंचवडे,
कार्यक्षम नगरसेवक मा संतोष अण्णा लोंढे, सौ नम्रताताई लोंढे, माजी नगरसेवक मा वसंत नाना लोंढे,मा सुरेश तात्या मेहेत्रे,
थोर सामाजिक कार्यकर्त्या ऍडवोकेट रेखाताई महाजन असणार आहेत.
भावी वधू-वर आणि पालक!बंधू भगिनींनो!
वीस वर्षांपूर्वी लावलेलं खान्देश माळी मित्र मंडळाचं छोटस रोपटं,आज रोजी वीस वर्षाचं झालं आहे!
१९९९साली घेतलेल्या पहिल्या वधू-वर मेळाव्यास आलेली त्यावेळची उपवर वधू आज वयाने खूप मोठी झाली असेल आणि तिचीच कन्या कदाचित जवळपास वीस वर्षाची झालीही असेल!
कदाचित तीच कन्या आज विसाव्या या वधुवर मेळाव्यास आली असेल!
एवढं भाग्य मंडळाला मिळत आहे.
बंधु-भगिनींनो!
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री एस के माळी साहेब आणि त्यानंतरचे अध्यक्ष श्री पी के महाजन साहेब यांचे उत्तम मार्गदर्शन अन अथक परिश्रमामुळे !उत्तम नेतृत्वामुळे आजपर्यंत यशस्वी मेळावे घेत आलोआहोत!
सर्वोत्तम साथ लाभली ती मंडळाच्या सर्व कार्यकारणी आणि वधुवर समितीच्या सर्व कष्टाळू, मेहनती कार्यकर्त्यांची!
वधू वर समितीचे पूर्व अध्यक्ष श्री रतन माळी सर आणि श्री किशोरजी वाघ साहेब यांचं योगदान कधीही विसरू शकत नाही. त्यांनी प्रत्येकाच्या हातात उजळणारी पणती दिली आहे.
वीस वर्षांपूर्वीची ही परंपरा अखण्डितपणे चालूच आहे!आपल्या सर्वांची साथ सांगत लाभल्यामुळे येथवर पोहचलो आहोत.असेच पाठबळ लाभलं तर खान्देश माळी मंडळ पुढील पन्नास वर्षे सुद्धा अविरत असेच मेळाव्याचे आयोजन करीत राहील! अशी आशा व्यक्त करतो आहे!
दोन मनांला,एक प्रेमाला,सद्विचारांना अंगिकरणारे खान्देश माळी मंडळ आहे. विवाहाचे सुंदर स्वप्न पाहणाऱ्या भावी वधू-वरांनो!आपल्या सर्व पालकांनो!सर्वच आपल्या मनासारखं होणार नाही,प्रत्येकाला शिक्षण,सौंदर्य,उंची,वर्णआणि धनसंपदा एकाच व्यक्तीत मिळणार नाही!कुठेतरी तडजोड करावीच लागते!आपण ही ती तयारी ठेवावी! मेळाव्यात जास्तीत जास्त मुलं मुली एकमेकांना पसंत करून भावी स्वप्न साकार करण्यासाठी आपण पहिली पायरी ओलांडणार आहात!आपला विवाह योग जुडून यावा यासाठी खान्देश माळी मंडळाने सामाजिक बांधीलकी अंगिकारून दर वर्षी वधू-वर या पवित्र यज्ञाचे,यागाचे आयोजन करीत आहे.अव्यातपणे गेल्या वीस वर्षांपासून या पवित्र कार्याचं भाग्य मंडळाला लाभलं आहे.आयोजनातील अडचणी, मेहनत,अनेक समस्यांना तोंड देत आमचे कार्यकर्ते सिंहाचा वाटा उचलतात,कुठलाही स्वार्थ नाही, लोभ नाही,स्वखर्चाने येऊन हिरीरीने कार्य करणारे मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे विशेष योगदान आहे!सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार ही मानतो.कार्यकर्त्या शिवाय मंडळ नसत.
बंधू भगिनींनो!
कार्यकर्त्यांनी जीव लावलेलं,जीव ओतलेलं हे मंडळ आहे.एकोपा जोपासलेलं खान्देश माळी मंडळआहे. सर्व जेष्ठांचे आशीर्वाद घेऊन म्हणूनच या वर्षी नव्या टीम ने हे कार्य खांद्यावर घेतलेलं आहे. दि१० नोव्हेंबरच्या वधू वर मेळाव्याने राज्यातील सर्व समाज बांधवांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मेळाव्यात येणारे जवळपास सर्वच वधू-वर हे उच्चशिक्षित असतातच.मंडळाच उत्तम आयोजन असत म्हणून खान्देश माळी मंडळाच नावं लौकिक आहे.खान्देश माळी मंडळ 'वर' आणि 'वधू' मधील दुवा म्हणून! माध्यम म्हणून!कार्य करीत आहे. त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथकपणे आपल्या सेवेसाठी वाहून घेतले आहे.
'लागावी हळद अंगाला,मंगल धून ऐकू याओवी कानी!तुम्हा वधू-वराची वरात,रुजावी अंतर्मनी!'
आपण दूरवरून, अर्थात संपूर्ण महाराष्ट्रातून येणार असाल.मेळाव्यात पोहोचे पर्यंतची दगदग सहन करून.आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी मेळाव्यास येणार आहात.हीच तर प्रत्येकाच्या मनाला लागलेली हुरहुर असते.लग्न एकदाच होतं असतं.उत्तम आणि मनासारखे स्थळ मिळण्यासाठी प्रत्येक वधू- वर पालक अनेक दिव्यातून जात असतो.
आम्ही आपली दगदग कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत.सर्वांना एकाच ठिकाणी मनपसंत स्थळाची निवड करता यावी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत!प्रयोगशील आहोत.
लग्न म्हणजे स्वप्नाची परिपूर्ती असते.संसार वेलीची पहिली पायरी म्हणजे लग्न असतं!लग्नाचा उत्तम योग जुडून यावा म्हणून भ्रमंती आलीच. पायात भोवरा बांधून वधू-वर संशोधन सुरू होतं.कोणी शहरातून कोणी खेडेगावातून मेळाव्याला येतात.कोणी श्रीमंत असतं तर कोणी आर्थिक दृष्ट्या कमकुवत ही असतो. सर्वच एका व्यासपीठावर समसमान असतात. कोणी लहान-मोठा नाही.आपली मुलाखत सर्वच येऊन देतात.
नवनात्यांच्या या खेळात विवाह जमून यावा.भिन्न कुळांचा उद्धार व्हावा अन पालकांची तारेवरची कसरत कमी व्हावी म्हणून मंडळ प्रयत्नशील आहे. ती दगदग कमी करण्यासाठीच मेळाव्याचे आयोजन करण्यात येत.
तो पुढाकार खान्देश माळी मित्र पिंपरी-चिंचवड पुणे परिसराने घेतला आहे.विवाह म्हणजे नवनात्यांचा खेळ असतो.त्या खेळात उतरल्याशिवाय नाते संबध जुडत नाहीत.
मेळाव्यास पूर्ण महाराष्ट्र्रातुन भावी वधू-वर आणि पालक यांच्या जेवणाची,मुलाखतीची, मेळाव्या नंतर वधू-वर सूची पुस्तक प्रकाशित करून पोस्टाने पाठविण्याची जबादारी ही मंडळ घेत आहे.उद्धिष्ट एकच आहे, समाजाची सेवा घडावी.मंडळाला समाज जोडण्याच भाग्य लाभावे एवढाच हेतू!
महाराष्ट्रातील माळी समाजाचे सर्व उपवर मुलं-मुली येत्या मेळाव्यास भरभरून प्रतिसाद देतीलच.आपण मेळाव्याला या आपला भावी जोडीदार स्वतः निवडा सुखी जीवनाचा आनंदी मार्ग निवडा!हाच शुभ संदेश देऊन थांबतो🌷🌷🌷🌷🙏🙏------ नानाभाऊ माळी-अध्यक्ष,सर्व कार्यकारणी सदस्य व वधु-वर समिती सदस्य, खान्देश माळी मित्र मंडळ,पिंपरी-चिंचवड पुणे परिसर यांच्या वतीने.