अमळनेर प्रतिनिधी-आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून कळमसरे येथील आरोग्यदूत व युवा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी राजपूत व त्यांच्या मित्राच्या रक्तातील माणुसकीला बातमी गावाकडची या पोर्टलच्या वतीने सलाम!
सध्या सोशलमिडीयावर आमचे मित्र पत्रकार गजानन पाटील यांनी एका गरजू महीलेला ओ पाँझीटिव्ह रक्ताची आवश्यकता अशा आशयाचा मेसेज टाकला.कळमसरे येथील आरोग्यदूत व त्याच्या मित्राने क्षणाचा उशीर न करता डॉ अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात जाऊन गरजू महीलेला रक्तदान करून रक्तातील माणुसकी जोपासली.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पाडळसरे ता.अमळनेर येथील आश्वीनी पवार या गरीब महिलेस O + दोन पिशवी रक्ताची आवश्यकता होती;याचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या (कळमसरे)येथील आरोग्य दूत शिवाजी भाऊ राजपूत यांनी व त्यांचे मित्र असे दोघे मिळून रक्तदान करीत माणुसकी धर्म पाळला आहे.शिवाजी याने या आधीही 15 ते 16 वेळेस रक्तदान करून आपली माणुसकी जिवंत ठेवली आहे.