राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान आमच गाव आमचा विकास अंतर्गत तालुकास्तरावर कार्यशाळेचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी- शासनाचा आमचा गाव आमचा विकास या कार्यक्रमांतर्गत २०१९-२० कृती आराखडा तयार करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत येथील सरपंच ग्रामसेवक तसेच गावपातळीवरील कर्मचारी यांचे संयुक्त प्रशिक्षण दिनांक ४ नोव्हेबरला नगरपरिषदेच्या शिवाजी नाट्य मंदीरात सकाळी १० ते २ या वेळेत नगरपरिषदेच्या शिवाजी नाट्य सभागृहात होणार आहे. सदर कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक यांना आपण उपस्थित राहण्यासाठी सुचित करावे,तसेच तालुका वैदयकीय अधिकारी यांनी आशा स्वयंसेवीका यांना,तालुका कृषीअधिकारी यांनी कृषी सहायक यांना,पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पशुधन पर्यवेक्षक यांना,बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अधिनस्त पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांना कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी सुचीत करावे असे अमळनेर तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.