लोकमान्य व मंगरूळ विद्यालयाचे विद्यार्थ्यांची नावे मंगळावर पोहचणार
नासा चा उपक्रम - ऐतिहासिक नोंद होणार , आतापर्यंत 75 लाख नावांची झाली नोंदणी
अमळनेर तालुक्यातील लोकमान्य विद्यालय व मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थ्यांची नावे थेट मंगळावर पोहचणार असून ही एक ऐतिहासिक नोंद होणार आहे
नासा नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्टरेशन चे मंगळावर “मंगळरोव्हर 2020“ हे अंतरीक्षयान लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणार्या मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे . या अंतरीक्ष यानावर स्टेन्सिल्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसर्या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. ही मोहीम मंगळ मोहिमेच्या प्रवासपर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहे.
नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या ( JPL ) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिप वर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या ( 75 नॅनोमिटर ) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. ह्या चिप रोव्हर वर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जातील . "या ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी रोव्हर तयारी करत असताना, सर्वजण या नव्या मोहिमेत सामील व्हावेत, सर्वाना याची माहिती व्हावी असे आम्हाला वाटते असे "नासाच्या वॉशिंग्टन येथील सायन्स मिशनचे डारेक्टरेट" (SMD) थॉमस झुरबुचेन म्हणाले.
या उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालयातील व मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची नावे नोदवण्यात आली. त्यांचे सदर उपक्रमाचे बोर्डिंग पास उपलब्ध झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगला अनुभव मिळाला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मंगळ ग्रह - त्या ग्रहावरची नासाची चालू असलेली मोहीम आणि पाठवले जाणारे "रोव्हर 2020" हे अवकाशयान" यांची माहिती देण्यात आली
आम्ही विद्यार्थ्यांना लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणार्या मंगळ ग्रहाची सखोल माहिती तसेच नासातर्फे पाठवले गेलेले SPIRIT आणि OPPORTUNITY या मंगळयानांची माहिती दिली व 2020 मध्ये पाठवले जाणारे मंगळयान यांचापेक्षा कसे आधुनिक आहे याचा फरक सांगितला शाळेच्या विद्यार्थ्यांना आपली नावे मंगळावर पाठवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना नासाच्या रोव्हरच्या काही चित्रफिती दाखवून त्यांच्या ज्ञानात भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे
प्रत्येक व्यक्ती 30 सप्टेंबर 2019 च्या रात्री 11.59 पर्यंत या उपक्रमांतर्गत नाव मंगळावर पाठवण्यासाठी mars.nasa.gov या संकेतस्थळावर नोंदणी करु शकता, तरी भारतातून जास्तीतजास्त लोकांनी आपले नाव नोंदवून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊयात, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, अवकाश संशोधन शास्त्राचा प्रचार प्रसार करूयात असे आवाहन भूषण महाले यांनी केले आहे .
रोव्हर 2020 हे यान "ऍटलस V 541" या रॉकेट च्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून 17 जुलै 2020 ते 5 ऑगस्ट 2020 मध्ये लॉन्च केले जाणार आहे जे 2021च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे.
या उपक्रमांतर्गत आपले नाव मंगळावर पाठवण्यासाठी खलील लिंकला स्पर्श करा आणि आपला बोर्डिंग पासही मिळवा.... https://go.nasa.gov/Mars2020Pass
या उपक्रमास मला शकुंतला प्राथमिक विद्यालयातील उपशिक्षक राहुल चौधरी
मुख्याध्यापक रवींद्र लष्करे , मुख्यध्यपक प्रकाश पाटील राजेंद्र निकुंभ , संजय पाटील, मनोहर महाजन,प्रभूदास पाटील , अशोक सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले
नासा ने संपूर्ण जगाला आपले नाव मंगळावर पाठवण्याची ऐतिहासिक संधी दिली आहे भविषयतील विश्वातील हलचालींनातर अथवा मंगळावर मानवी वस्ती झाल्यास इतिहासाचे साक्षीदार असल्याचा आनंद होईल -
संजय पाटील उपशिक्षक