Halloween party ideas 2015



नागपूर येथे माळी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन 

नागपूर प्रतिनिधी

महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर 60 वर्षे पूर्ण निमित्ताने

माळी समाजाचे नागपूर महात्मा फुले शिक्षण संस्था मोठी असून त्यास 60 वर्षे पूर्ण होता आहेत त्यानिमित्ताने माळी समाजातील विविध संघटना,त्याचे प्रमुख अधिकारी ,समाज संघटक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सप्टेंबर मध्ये दोन दिवसाचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे मा अशोकरावजी मानकर यांनी सांगितले आज नागपूर हे देशाच्या राजकीय क्षेत्राचे केंद्रबिंदू बनले आहे तसेच माळी समाजाचे आस्था असणारे पूर्वी माळी समाज संघटन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतलेले आणि नुकतेच श्रीक्षेत्र अरण येथे श्री संत सावता महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले मा अशोकरावजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली माळी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे नियोजन ठरलेले आहे त्यादृष्टीने नागपूर मध्ये नुकतीच बेठक झाली त्यास विदर्भातील माळी समाजाचे प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते त्यात मा अशोकरावजी मानकर मा आमदार मा आमदार ड्रा जे एस ढोणे संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार 
महात्मा फुले बॅँक चेअरमन राजेंद्रजी आंडे अशी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बेठकीत निर्णय घेण्यात आला पुढील बेठकीत महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहेत त्यात किरण झोडगे रविकाका बोरावके, के एस माळी ,बाजीराव तिडके, रामदास डोके दशरथ कुळधरण कुंडलिक चौधरी, रावसाहेब अंभोरे, गोविंद डाके किशोर बोरावके आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे तरी देश पातळीवर माळी समाजाचे अधिवेशन त्यात श्रीसंत सावता महाराज,महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे विचार मंथन आणि राजकीय,सामाजिक सांस्कृतिक उद्योग,व्यवसायात माळी समाजाची स्थिती आणि त्यादृष्टीने समाजाने नवीन आव्हानात्मक परिस्थिती कसे सामोरे जावे असे विविध विषयांवर संवादात्मक चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहे अशी माहिती संयोजक अशोकराव मानकर यांनी दिली आहेत

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.