अमळनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अनोखा उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी
२४ फेब्रुवारी रोजी सरकारने पीएम-किसान योजना जाहीर केली होती, त्यात २ हेक्टपर्यंत जमीन असलेल्या लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते. सरकारने योजनेची व्याप्ती वाढवून त्यात आता सर्वच शेतक ऱ्यांचा समावेश (जमिनीचा निकष न लावता) केला आहे. "पीएम-किसान सन्मान निधी योजनेसाठी आता 2 हेक्टर क्षेत्राची अट आता शिथिल,संयुक्त असो अथवा सामाईक शेतकरी"आणेवारी असो अथवा नसो,गावातील प्रत्येक शेतकरी कुटुंब आता पीएम-किसान योजनेसाठी पात्र होणार आहे.त्यासाठी आपले आधार कार्ड,बँक पासबुक ची झेरोक्स प्रत ही आपल्या गावातील ग्रामविस्तार अधिकारी ,तलाठी यांच्या कडे जाऊन आजच तात्काळ जाऊन आपले नाव नोंदणी करा असे आव्हाहन अमळनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.तहसीलदार ज्योती देवरे यांनी आपल्या स्वतःच्या आवाजात या योजनेची संपूर्ण माहिती ही मराठी आणि अहिरानी भाषेत आणि आपल्याच आवाजात पीएम-किसान योजनेच्या माहिती चे अप्रमिम असे गाणे ही त्यांनी गायन केलेले आहे. हे सर्व रेकॉर्ड करून जवळपास अमळनेर तालुक्यात 25 ते 30 रिक्षा नेमण्यात आल्या असुन ,लाउड स्पीकर द्वारे गावोगावी ही माहिती दिली जात आहे. आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी ग्रामविस्तार अधिकारी, तलाठी यांना गावात उपस्तित राहण्यास सांगितले होते, आणि गावातील प्रत्येक शेतकऱ्याला योजनेची माहिती समजाऊन सांगून त्यांची नोंदणी तात्काळ करून घेण्यास सांगितले आहे.यावेळी कळमसरे ग्रामविस्तार अधिकारी एस.डी.सोनवणे, कळमसरे तलाठी के.एस.चौधरी, आर.पी.साळुंखे, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे,कळमसरे गावातील ग्रामस्थ आदि उपस्तित होते.