सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असल्या बद्दल आ शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे प्रा जयश्री दाभाडे साळुंके यांचा मानचिन्ह देऊन गौरव
अमळनेर प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारा तर्फे आयोजित सत्कार समारंभात विशेष मानचिन्ह देऊन आमदार शिरीष दादा चौधरी आणि हिरा उद्योग समूहाचे अध्यक्ष बापूसाहेब रवींद्र चौधरी सत्कार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा साळुंके ह्या सातत्याने 22 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विविध आंदोलने,रास्ता रोको, मोर्चे या माध्यमातून सामान्य जनतेच्या प्रश्नावर लढत असतात. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासिंचे प्रश्न,समस्या यावर कार्य करत असतात. आजवर अनेक प्रकरणे प्रा साळुंके यांनी यशस्वीपणे हाताळली आहेत. त्यांनी 8 बालविवाह थांबविले असून जवळपास 2000 च्या कुटुंबांचे समुपदेशन करून त्यांचे संसार उजाड होण्या पासून थांबविले आहेत.समाज कार्यासाठी त्यांना अनेक वेळा अटकही झाली आहे अमळनेर तालुक्यातील रेशन भ्रष्टाचार विरोधात त्यांनी अग्रेसर भूमिका घेऊन अयोग्य दुकाने बंद केली आहेत आजवर प्रा साळुंके यांना अनेक पुरस्कार त्यांच्या कार्यासाठी मिळाले असून काल आपल्या *माहेरचा सत्कार* मा आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते स्वीकारला.आता पर्यंत बाहेर अनेक सत्कार पुरस्कार मिळाले परंतु अमळनेर शहरात काम करत असल्याने या माहेरच्या सत्काराने त्यांना कार्य करण्याची अधिक प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल तसेच अजून जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.