सानेगुरुजी वाचनालयाच्या वतीने झालेला सत्कार अविस्मरणीय
श्यामकांत भदाने
उपाध्यक्ष जळगाव ग .स .पतपेढी
अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने नुकताच विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सानेगुरुजी वाचनालयाची अध्यक्ष दिलीप सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे जळगाव ग.स पतपेढीचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाने,वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे, खाजगी क्लासेसचे राज्य कार्याध्यक्ष भैयासाहेब मगर, माध्यमिक शिक्षक विजय वाघ होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले.
पूज्य साने गुरुजी व मोफत वाचनालय यांच्यावतीने दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. नुकतेच विविध क्षेत्रात निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला .जळगाव ग.स पतपेढी उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले शामकांत भदाने, सुवर्णकार समाज समाजाच्या डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले राजेंद्र पिंगळे, महाराष्ट्र राज्याच्या खाजगी क्लासेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेले भैय्यासाहेब मगर, साने गुरुजी ग्रंथालय वाचनालयाच्या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी पुस्तक घेण्यासाठी पाच हजार रुपयाची देणगी देणारे शिक्षक विजय वाघ यांचा वाचनालयाच्या पदाधिकारी यांनी शाल व बुके देऊन यथोचित सत्कार केला.
सत्कार प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने झालेला सत्कार अविस्मरणीय आहे जेव्हा परिवारातील पदाधिकाऱ्यांकडून सत्कार होतो तोच सत्कार कार्य करण्यास प्रेरणा देतो. सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक व सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात आमचे नेहमीच आपणास सहकार्य राहील आपण असेच भविष्यात वाचनालयाच्या माध्यमातून वाचक वर्गासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी कटिबद्ध राहाल ही अपेक्षा बाळकतो. स्पर्धा परीक्षातील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विजयसिंग पवार यांच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध झाली आहे .त्या संधीचे आपण सोने करावे भविष्यात या वाचनालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त अधिकारी निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. भैय्यासाहेब मगर यांनी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना देशाचे माजी राष्ट्रपती कै.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी पंचसूत्रे सांगून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणातून दिलीप सोनवणे म्हणाले की सानेगुरुजी वाचनालयात आम्हाला एक संधी मिळाली अन त्या संधीचे आमचे कार्यकारी मंडळ वाचनालयाच्या व ग्रंथालयाचा विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहील व समाजातील व विविध क्षेत्रात गुणवंतांच्या पाठीशी नेहमी कौतुकाची आम्ही थाप ठेवू त्यांचा सन्मान करू आणि या सन्मानतूनच त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल म्हणून आम्ही दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन अँड रामकृष्ण उपासनी यांनी केले. यावेळी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंग पवार
भाऊसाहेब देशमुख, जे.डी.निकुंभ,
पत्रकार उमेश काटे सोपान भवरे व स्पर्धा परीक्षेतील भावी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रा.माधुरी भांडारकर, विश्वस्त बापू नगांवकर,
संचालक भीमराव जाधव, निलेश पाटील, पी एन भादलीकर, दीपक वाल्हे, प्रसाद जोशी व वाचनालयाचे कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
फोटो
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथील स्पर्धा परीक्षा केंद्राला पाच हजार रुपये पुस्तके घेण्यासाठी विजय वाघ देताना सोबत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे चिटणीस प्रकाश वाघ उपाध्यक्ष माधुरी भांडारकर,भाऊसाहेब देशमुख व संचालक मंडळ