Halloween party ideas 2015


आ.स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने ग्रामीण रस्त्यासाठी निधी उपलब्ध
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्याच्या विकासासाठी आ.स्मिता स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने निधी
उपलब्ध करून देण्यात आला आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक
बांधकाम विभागाच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे
जावे लागत होते.नागरिकांची समस्या लक्ष्यात घेवून आ.स्मिता वाघ यांनी ह्या रस्त्याच्या डांबरीकरण
तसेच मजबुतीकरणासाठी ३०५४,५०५४ व एसआर लेखाशिर्षां अंतर्गत निधी उपलब्ध करून
देण्याबाबत पाठपुरवा केला होता.
आ.स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश आले असून ग्रामीण भागातील ग्रामीण रस्त्याच्या
विकासासाठी निधी मंजूर करण्यात आल्या मुळे नागरिकांची अडचणी सुटण्यास मदत होणार
आहे.नागरिकांनी आ.स्मिता वाघ यांचे आभार व्यक्त केले आहेत तर आ.वाघ यांनी राज्याचे महसूल व
सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील व पालकमंत्री मा.ना.श्री.गिरीष महाजन यांचे
विशेष आभार व्यक्त केले आहे.
३०५४/५०५४ लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर कामे
०१)जानवे-शिरूड रस्ता किमी ०/०० ते २/५०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व किमी
२/१०० वर मोरी बांधकाम करणे.(ग्रामा१७)-४१.५४ लक्ष.
०२)अमळगांव-खेडी-खौशी-नांद्री किमी ०५/०० ते ०७/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व
किमी ०६/२०० वर मोरीचे बांधकाम करणे.(ग्रामा-१००)-३५.३० लक्ष
०३)मुडी-वावडे रस्ता किमी ०/०० ते ०२/५०० मोरीसह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे(ग्राम-
९४)-३१.००लक्ष
०४)अमळगांव-दोधवद रस्ता किमी ०/०० ते ०३/०० मोत्यासह मजबुतीकरण व डांबरीकरण
करणे(ग्रामा-६०)-३७.३५ लक्ष
०५)मंगरूळ-वाघोदे रस्ता ०/०० ते ०३/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे(ग्रामा९५)-१६.२३
लक्ष
०६)ब्राम्हणे-एकलहरे रस्ता ०/०० ते ०२/०० मोच्यासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ग्रामा-
५९)-२५.०० लक्ष
०७)मालपुर ते अंतुर्ली रस्ता ०/०० ते २/५०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व किमी ०१/४००
वर मोरीचे बांधकाम करणे.-१९.५० लक्ष
एसआर लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर कामे
०१)एरंडोल-कल्याणी-निम-शहापूर-भिलाली-मांडळ रस्ता प्रजिमा ५२ किमी ७८/०० ते ४२/०० ची
दुरुस्ती करणे.-९०.०० लक्ष
०२)बोळे-मोंढाळे-अमळनेर-मारवड-निम-कपिलेश्वर रस्ता प्रजिमा ४९ किमी २१/७०० ते २६/४००
मध्ये दुरुस्ती करणे-७५.०० लक्ष.
अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे आ.स्मिताताई वाघ यांचे अभिनंदन केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.