Halloween party ideas 2015



अमळनेर शहरात आ.शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नाने 2 कोटी निधीतून विकासकामांचे भूमिपूजन

विविध प्रभागात होणार रस्त्यांचे निर्माण,प्रभागनिहाय झाले भूमिपूजन,आ.चौधरींकडून नगरसेवकांना अनोखी भेट
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील कार्यसम्राट आमदार शिरीष चौधरी यांनी शहरातील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागासाठी विकास कामांची अनोखी भेट दिली असून माध्यमातून विविध प्रभागात सुमारे  2 कोटी निधीतून रस्त्यांचे निर्माण होणार आहे.या विकासकामांचे थाटात भूमिपूजन आमदार शिरीष चौधरी ,हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी व विविध पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
             आ चौधरी व डॉ रविंद्र चौधरी यांनी काही प्रभागात जाऊन हे भूमिपूजन केले,अनेक ठिकाणी त्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले,यावेळी न प चे गटनेते प्रवीण पाठक,अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, पत्रकार राजेंद्र पोतदार,अमळनेर अर्बन बँकेचे संचालक पंडित चौधरी, श्रीराम चौधरी, गंगाराम महाजन, आरिफ भाया, नरेंद्र चौधरी,बाळासाहेब सदांनशिव,सलीम टोपी, संतोष लोहरे,पंकज चौधरी, श्याम पाटील, किरण बागुल, धनंजय महाजन,महेश जाधव, सुरेश सोनवणे, फिरोज पठाण, भाऊसाहेब महाजन, साखरलाल महाजन, प्रताप शिंपी, सुनील भामरे, गुलाम नबी, अविनाश जाधव, आबु महाजन, दीपक चौगुले, पांडुरंग महाजन,पर्याक पटेल, किशोर पाटील,विक्की जाधव, मनोहर महाजन, सुनील महाजन,जाकीर मेवती,प्रितपालसिंग बग्गा, महेंद्र जैन, शशांक सदांनशिव,प्रसाद शर्मा, प्रवीण महाजन, मिलिंद डेरे, भूषण बडगुजर,दिनेश मणियार, व समाज बांधव व आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.ही विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणार आहेत.

*या प्रभागात होणार रस्ते*

प्रभाग 1 मधील इराणी मोहल्ला रस्ता करणे 17 लाख,प्रभाग 5  कांती शेठ यांच्या दुकानापासून ते सिंधी कॉलनी गेट पर्यत तसेच कलिम मिस्त्री ते कब्रस्थान गेट पर्यत रस्ता डांबरीकरण करणे व कारभारी वामन पारधी ते चांद शेख शिकलीकर यांच्या घरापर्यत रस्ता काँक्रीटीकरण करणे 26.50 लाख,प्रभाग क्र 6 मधील सुभाष सिंग परदेशी ते विठ्ठल काटकर व गजानन शिंपी ते कोठारी तसेच गुलाब नबी ते अजगर सइद यांचा घरापर्यत रस्ता डांबरीकरण करणे 20 लाख
प्रभाग क्र 9 मधील आय पी जैन ते बाबा बोहरी पेट्रोल पंप तसेच महेंद्र शेठ कोठारी ते अर्बन बँक कॉर्नर रस्ता डांबरीकरण करणे 10.25लाख,प्रभाग क्र 11 मध्ये सिंद्धिविनायक मंदिर ते कोचर यांच्या घरापर्यत  व अग्रवाल स्वीट मार्ट ते चंदू परदेशी यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, गुरव सर यांच्या घरापासून ते गणेश मंदिरपर्यत व हाजी सलीम बागवान यांच्या घरापासून ते एस के ज्वेलर्स तसेच चौधरी यांच्या घरापासून ते बेलदार मस्जिद पर्यत रस्ता काँक्रीटीकरण करणे 17.85 लाख,प्रभाग क्र 12 मध्ये प्रेम पान सेंटर ते गांधी नगर नाल्यापर्यत तसेच अजीज ठाकूर ते फारुख टेलर यांच्या घरा पर्यत रस्ता डांबरीकरण करणे, तसेच धनंजय महाजन ते वना जाधव तसेच साईबाबा वाचनालय ते शेख साहेब यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 20 लाख,प्रभाग क्र 12 मधील इस्लामपूर मशिदीमागील भागात व फारुख टेलर घरामागील भागात तसेच मंगलादेवी चौक , न्हावी वाडा ब्रम्हे गल्ली, पाठक गल्ली भागात रस्ते काँक्रीटीकरण करणे 20 लाख,
प्रभाग क्र 15 झामी चौक ते शेलकर डॉक्टर तसेच हनुमान नगर व प्रवीण चौधरी यांच्या घरापर्यत व श्रीराम कॉलनी भागात रस्ता डांबरीकरण करणे 21.52 लाख,प्रभाग क्र 16 चंदनपिर चौक ते श्रीकृष्ण मंदिर तसेच मण्यार मस्जिद मागील रस्ता व योगेश मोरे  ते संदीप महाजन यांच्या घरापर्यत रस्ता तयार करणे 13.60 लाख.
           आदी कामांचा समावेश आहे.सदर विकासकामाबद्दल सर्व नगरसेवकांनी जनतेच्या वतीने आ शिरीष चौधरी यांचे आभार व्यक्त केले आहेत.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.