अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र शासन प्रज्वला योजना अंतर्गत महिला बचत गट प्रशिक्षण महाराट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला
अमळनेर शहरातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात प्रज्वला योजना अंतर्गत बचत गटाचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर होत्या.
याप्रसंगी त्यांनी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या महिलांना संबोधित करतांना सांगितले की, महिलांचे माहेर म्हणजे राज्य महिला आयोग होय. महिलांच्या न्यायासाठी, कायद्याची माहिती बचत गटा पर्यंत पोहचवणे हा मूळ उद्देश आयोगाचा आहे, वर्षाला जवळ जवळ 5 हजार केसेस आयोगाकडे येतात, त्यांना न्याय देण्याचे काम आयोग करीत असते, शासनाने बचतगट साठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, सरकारला महिलांच्या समस्याची जाणीव असल्याने त्याची काळजी घेण्याकरिता योजनाचे काटेकोरपणे पालन करणे करिता आयोग दक्ष आहे, महिलांच्या आजारपणा साठी सरकारची मुख्यमंत्री सहाय्य निधी योजना आहे. केंद्र सरकारने आयुष्य भारत योजना राबवली जात आहे, बचत गटांना( स्वयं सहाय्यता गट) आपल्या पायावर उभे राहण्यासाठी सुमतीताई सुपलीकर योजना शून्य टक्के व्याजाने कर्ज देते, दशसूत्री चालवणारे बचत गटांना फिरत भाडवल (15,000/-), नवतेजस्विनी योजने अंतर्गत दोनशे कोटी ची तरतूद, प्रधानमंत्री मुद्रा योजना, आदी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, या पुढे एका जिल्ह्यात एक वस्तूची निर्मितीची योजना सुरू करणार असल्याचे सांगून महिलांशी संवाद साधला.
या प्रसंगी विधानपरिषद आमदार सौ स्मिता पाटील, प्रज्वला कार्यक्रमाचे प्रमुख अर्चना वाणी, अमळनेर प्रांत अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, सभापती वजाबाई भिल, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर,गट विकास अधिकारी अजयकुमार नष्टे, उप गटविकास अधिकारी संदीप वायळ, सेवानिवृत्त आय पी एस साहेबराव पाटील,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी तर आभार सीमा रगडे यांनी केले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. तसेच प्रत्येक महिलेला माहिती पुस्तिका सह प्रशिक्षण केल्याचे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले