श्यामकांत भदाणे
उपाध्यक्ष-जळगांव ग.स.पतपेढी
अमळनेर प्रतिनिधी-फळाची अपेक्षा न ठेवता कार्य केले तर एकदिवस त्याची दखल घेतली जाते व सन्मान होतो,सन्मानाचा सत्कार होतो,सत्कारातून सामाजिक कार्य करतांना प्रेरणा मिळते, असे अमळनेर येथील पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे सत्कारप्रसंगी जळगाव ग स पतपेढीचे उपाध्यक्ष शामकांत भदाने अध्यक्षीय भाषणातून बोलत होते
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे सत्कारमूर्ती निलेश पाटील ,दीपक वाल्हे होते.
वर्णेश्वर महादेव मंदिर सेवा संस्थांच्या वतीने नुकताच वाचनालयाचे संचालक निलेश पाटील यांना युवा उत्कृष्ट उद्योग क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित केले गेले.व वाचनालयाचे संचालक दिपक वाल्हे यांनी एम.लीब पदवी संपादन केल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष व जळगांव ग.स.पतपेढीचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, व वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना वाचनालयाचे संचालक निलेश पाटील, दिपक वाल्हे यांनी सांगितले कि आज परीवारातील माणसांनी जो सत्कार केला.त्यामुळे निश्चितच कार्य करतांना प्रेरणा मिळेल असे सांगितले. तर प्रमुख अतिथी व वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी सांगितले की वाचनालयातील सदस्यांचा चांगल्या कामामुळे सत्कार झाला. त्यांनी त्याचा उपयोग वाचनालयाच्या विकासासाठी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
साने गुरुजी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंग पवार, सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र पाटील,हेंमत भांडारकर, प्रा.डॉ माधुरी भांडारकर यांनीही निलेश पाटील, दिपक वाल्हे यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ईश्वर महाजन यांनी केले. यावेळी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ,विश्वस्त बापू नगांवकर, संचालक भिमराव जाधव,पी.एन भादलीकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.