अझीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित विद्यार्थ्यांना सुनील भाऊ मित्र परिवारातर्फे जी एस हायस्कूल मध्ये गणवेश वितरण
अमळनेर प्रतिनिधी
विप्रोचे अध्यक्ष व दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले अझीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील वंचित असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना सुनील भाऊ मित्र परिवारातर्फे जी एस हायस्कूल मध्ये गणवेश वितरण करण्यात आले.
24 जुलै हा विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा असलेले जगप्रसिद्ध व दानशूर असलेले अझीम प्रेमजी यांनी स्वतःच्या उत्पन्नातून शिक्षणासाठी दान देणे सुरू केले आहे. ते अमळनेर येथील मूळ रहिवासी असून त्यांच्या हाशिम प्रेमजी या त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी विप्रो या उद्योगाची धुरा सांभाळली त्यात यशस्वीपणे काम करत जगातील श्रीमंत उद्योगपतीत गणना होत असताना त्यांनी आपल्याकडील असलेल्या संपत्तीचा विनियोग सामाजिक कार्यासाठी केला त्या कार्याचा धडा घेऊन अल्प का होईना आपण पण सामाजिक काम करावे या अनुषंगाने येथील उद्योगपती सुनील राजाराम चौधरी मित्रपरिवाराने कार्यकर्त्यांनी 350 विद्यार्थ्यांना जी एस हायस्कूलमध्ये गणवेश वितरण केले. यावेळी अध्यक्षस्थानी डीवायएसपी राजेंद्र ससाणे व विप्रो कंपनीचे अधिकारी जितेंद्र शर्मा व संजय तेली, भोजूभाई माहेश्वरी, राजाराम वामन चौधरी यांच्या हस्ते गणवेश वितरण करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाने म्हणाले की
भारतात ज्यांचे नाव सर्वदूर आहे अशा दानशूर व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस साजरा करून तळागाळातील मुलांना गणवेश वितरणाचा कार्यक्रम स्तुत्य आहे असे अमळनेर येथील पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाने यांनी सांगितले
यावेळी जी एस हायस्कूल चेअरमन योगेश मुंदडा, प्रदीप जैन, पंकज मुंदडा, बाळू कोठारी, महावीर पहाडे, सुनील माहेश्वरी, नानासाहेब देशमुख, बाळासाहेब कदम शेखर धनगर महेंद्र पाटील धनराज चौधरी, हरीश चौधरी, विजय पाटील आदी उपस्थित होते.
फोटो