अंपगाच्या मागण्या मान्य नाही झाल्यास प्रहार संघटनेच्या वतीने ५ आँगष्ट रोजी पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन.
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक २४ रोजि अपंगांच्या विविध मागण्यांची पूर्तता होण्यासाठी गटविकास अधिकारी संदीप वायाळ साहेब यांना प्रहार अपंग क्रांती आंदोलन अमळनेर यांच्यातर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला.अपंगांच्या विविध समस्यांबाबत गेल्या वर्षांपासून पाठपुरावा करूनही पंचायत समिती याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे म्हणून शेवटी दिनांक ५ ऑगस्ट रोजी मागण्या मान्य न झाल्यास पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे देण्यात आला.यावेळी आमदार स्मिताताई वाघ सभापती वजाबाई भिल याही उपस्थित होत्या यांनी अपंगांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितींच्या अधिकाऱ्यांशि लोकप्रतिनिधी या नात्याने मार्गदर्शन पर चर्चा केली.यावेळी प्रहार क्रांती आंदोलनाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील,शहराध्यक्ष योगेश पवार ,.प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष पंकज पाटील., धुळे शहर अध्यक्ष व खजिनदार अॅड. कविताताई पवार, प्रहार क्रांती आंदोलन धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी.प्रहार क्रांती आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.