हजारो च्या संख्येत आदिवासी बांधवांचा सहभाग
अमळनेर प्रतिनिधी,(ईश्वर महाजन)
अमळनेर येथे आज
लोक संघर्ष मोर्चा च्या माध्यमातून सरकारच्या नाकर्तेपणा च्या विरोधात आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अनुसूची 5 वी आणि 6 व्या नुसार आदिवासी बांधवांना जल-जंगल-जमिनीचा पूर्ण मालकी हक्क दिलेला असून सुद्धा सरकार त्यांना पुरेसा हक्क मिळवून देत नाही, बड्या भाडवलंदार विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी हिसकावत आहे तसेच त्यांना मूलभूत अधिकार पासून वंचीत ठेवत असल्याने त्यांना पोटाला चिमटा देऊन रस्त्यावर उतरावे लागत आहे.
या मोर्च्यांत प्रामुख्याने आदिवासींच्या
वन हक्क कायद्याची अमलबजावणी करा, वन विधेयक १९२७मधील सुधारणा विधेयक मागे घ्या , सर्व शेतकऱ्यांना मान्य केल्या प्रमाणे दुष्काळी अनुदान त्वरित आदा करा, स्वाभिमान सबळीकरण योजने अंतर्गत तात्काळ भूमिहीन आदिवासींना जमिनी द्या, जंगल-पाडे महसूल करा, वन जमीन धारकांना तात्काळ 7/12 देण्यात याव्यात, अतिक्रमण जमिनीवर असलेले घर तात्काळ नियमनाकुल करावीत, मोटर सायकल असणाऱ्या लोकांना रेशन बंद ही जाचक अट रद्द करावी ह्या सह अनेक स्थानिक मागण्या सह हा मोर्चा प्रांत कार्यालयावर येऊन धडकला.
सदर मोर्चा प्रांत कार्यलया समोर ठिय्या मांडून बसल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता.त्यामुळे प्रांत कार्यलय परिसरात मोर्चेकऱ्यानां खाली बसण्याकरिता ताडपत्रीची व्यवस्था करण्यात आल्याने सर्व मोर्चे करी सदर ठिकाणी जाऊन बसल्याने वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागला.
मोर्च्यांत आदिवासी बांधव आपल्या पारंपारिक वेशभूषेत आलेले होते, ढोल-ताशा च्या गजरात ताल धरून आदिवासी नृत्य करीत आपला सरकार वरील संताप व्यक्त करतांना दिसत होते
ह्या वेळी सबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यानं बरोबर चर्चा करून लेखी घेतल्या शिवाय हा मोर्चा हटणार नसल्याने पोलीस यंत्रणेसह प्राशसकीय अधिकाऱयांची चांगलीच दमछाक झाली होती.
मोर्चा पैलाड येथील शनी मंदिरा पासून निघून दगडी दरवाजा मार्गे बस स्टँड ,महाराणा प्रताप चौक मार्गे प्रांत कार्यालय येथे आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
याप्रसंगी मोर्च्यांचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी उपस्थित आदिवासी बांधव यांना भाषणाद्वारे संबोधित केले,त्यानंतर अमळनेर प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले व निवेदनातील मागण्या जो पर्यंत मान्य होणार नाही तो पर्यंत एक ही आदिवासी बांधव येथून हलणार नसल्याचे सांगत.त्यानंतर प्रांत अधिकारी यांच्या दालनात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यां सोबत बैठक घेण्यात आली. या वेळी मागणीतील प्रत्येक विषयावर चर्चा करून सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा उशीरा रात्री पर्यंत सुरू होती.
या मोर्च्यांचे नेतृत्व प्रतिभा शिंदे यांनी केले तर याप्रसंगी मुकुंद सपकाळे,प्रकाश बारेला,धर्मा बारेला, बुधा बारेला,विनोद देशमुख, सचिन धांडे,संजय शिरसाठ, रैना बारेला, पन्नालाल मावळे, ,संजय पवार, मधुकर चव्हाण, जयश्री दाभाडे, अविनाश पवार,प्रकाश पारधी, गाजू बारेला, इरफान तडवी , जिला वसावे , नितीन साळूंके, हेमंत दाभाडे, धनराज पारधी, आप्पा दाभाडे, भुरा पारधी आदी लोकांसह हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते
याप्रसंगी बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.अमळनेर चे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बांधव कायदा सुव्यवस्था राखण्याकामी तत्पर दिसले.
फोटो