Halloween party ideas 2015

शिक्षकांना लागू होणार जुनी निवृत्त वेतन योजना .
जुन्या पेन्शन संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीताताई शिंदे यांच्या उपोषणाला यश.
... अखेर शासनाने समिती नेमली 
समितीला तीन महिन्याच्या आत निर्णय सरकार पुढे सादर करेल. 
 अमळनेर प्रतिनिधी( ईश्वर महाजन) राज्यातील सर्व अनुदानित विनाअनुदानित अंशत अनुदानित पदावर आणि तुकड्यांवर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लागू करण्यासंबंधी अभ्यास करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. अनुदानित ,विनाअनुदानित, अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तारीख आणि टप्पा अनुदान दिल्याची तारीख विचारात घेऊन समिती तसा अहवाल तिन महिन्याच्या आत  सरकारला सादर करेल.                      
ब्राईट 
2005 पूर्वी नियुक्त झालेल्या व टप्प्याटप्प्याने अनुदानावर असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणे हा त्यांचा हक्क आहे. एकीकडे शासन विनाअनुदानित शाळेतील सेवा वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी  ग्राहय धरते, टप्पा अनुदान देणे हे शासनाचे धोरण होते, तेथे कर्मचाऱ्यांनचा कोणताही दोष नाही,या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जुन्या पेन्शन संघर्ष समितीच्या नेत्या संगीता ताई शिंदे व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनीही ही समस्या शालेय शिक्षणमंत्री अर्थमंत्री विरोधी पक्षनेते यांच्या निदर्शनास आणून दिली व शासनाला ते मान्य करावे लागले व समिती गठीत केली लवकरच शासन 2005 पूर्वीच्या अंशतः अनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करेल . शासनाने समिती नेमल्याबद्दल शासनाचे जुन्या पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने मनस्वी आभार.

संभाजी पाटील
(चाळीसगांव)
जिल्हाध्यक्ष
जुनी पेन्शन संघर्ष समिती जळगाव

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.