सच्चा समाजसेवक ,समाजभूषण कुळधरण सर
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) समाज भूषण कुळधरण साहेब एक सेवाव्रती, सरळ मनाचा माणूस ,फक्त सेवा करणे हेच कर्म तोच धर्म !असे मानणारा कृतिशील माणूस!
एकच ध्येय, एकच ध्यास! मदत करण्याचा ध्यास! गरज असेल तेथे धावून जाण्याचा ध्यास. लोकांचे भले करण्याचा मग अशा प्रसंगी खिशाला चाट वेळेची कमतरता , बरे वाइट प्रसंग ,अनुकूल-प्रतिकूल प्रसंग ,इत्यादी आपसूकच आलेत !हे माहित असतं की ज्यांच्यासाठी ही सर्व धावपळ करावी त्यांना त्याचे काही सोयरसुतक नसतं ,तरीदेखील कुठल्याही मान सन्मानाची अपेक्षा न करता केलेले हे खरे समाजकार्य हे एखाद्या व्रतस्थ सामाजीक बांधिलकी मानणार्या व्यक्तीकडूनच होत असते .अशी व्यक्ती म्हणजे माळी समाजातील अभ्यास योग्य समाजसंघटन असलेली माननीय समाज भूषण कुळधरण साहेब होय.
कस्तुरी मृगाला शोधण्यासाठी जावे लागत नाही की सोनचाफा कुठे फुलला हे शोधण्यासाठी गरज नसते त्याचा सुगंधच त्याची जाणीव घेऊन दरलळत येतो. कुळधरण साहेबांसारख्या माणसाला समजण्यासाठी त्यांनी जमविलेला गोतावळ्यातून होणारी त्यांची ओळख पुरेशी आहे ,नाती जपताना त्यांनी हाच विचार केला.
दोन दिवसापूर्वी कुळधरण साहेबांचा मला फोन आला यावर्षी संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने पुरस्कारासाठी तुमची निवड करायची आहे थोडावेळ मी विचारात पडलो एक समाजाचा महाराष्ट्रातील ज्यांना आपण पाहिले नाही फक्त फोनवर व प्रत्यक्ष मेसेज द्वारे संपर्क होत असतात आपल्या कामाची दखल कुळधरण साहेब सारखे समाजभूषण माणसं घेतात हीच आपल्या कामाची पावती आहे. साहेबांनी मला पुरस्काराविषयी सांगितले आणि लवकर कळवा मी सरांना माझ्या काही खाजगी काम असल्याने घरगुती कामात व्यस्त असल्याने मी ह्या वर्षाला पुरस्काराला नकार दिला. कुळधरण साहेब सारखे समाजाचे काम संपूर्ण देशभर करतात पण खरा हिरा शोधण्याची त्यांच्याकडे असलेली कसाब वाखानण्याजोगी आहे .साहेबांचे काम म्हणजे वर्षभर राबवित असलेले कार्यक्रम ,समाज संघटन ,यासाठी त्यांनी दिलेला वेळ हीच सरांच्या कामाची पावती आहे असं मला वाटतं. समाजातील तळागाळातील नागरिको महिलांवर अन्याय झाला असेल साहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.
कुळधरण साहेबांकडून अशीच समाजाची सेवा घडो या शुभेच्छा!💐
कुळधरण साहेबांकडून अशीच समाजाची सेवा घडो या शुभेच्छा!💐
वृत्तपत्र क्षेत्रातील उत्तम अनुभव ,राज्यातील सर्व भागाची माहिती ,
समाजातील उत्तम काम करणाऱ्यांना शोधून त्याची माहिती समाजपर्यत पोचवितात
तसेच समाजात सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करून श्रीक्षेत्र अरण येथे माळी समाज मोठ्या संख्येने जाऊ लागला हे भरीव कासम करणारे दशरथ कुळधरण सो यांचे अभिनंदन अभिनंदन !💐💐💐👌
आता त्यांनी युवा पिढीवर लक्ष देऊन त्यांना समाज संघटन प्रवाहात आणून त्यांना समाजाचे नेतृत्व हाती येईल त्यामुळे आदर्श समाज घडेल
तसेच त्यांनी सामाजिक कार्य करणारे लोकांनी समाजाचे संघटन करावे म्हणून अरण येथे त्यांना सन्मानित करून समाजापुढे आणले हा मोठा दृष्टीकोन महत्वाचा आहे.