Halloween party ideas 2015


स्विकृत नगरसेवक पदासाठी आ.शिरीष चौधरी आघाडीतर्फे 

सर्व समाज बांधवांना संधी देण्याची परंपरा कायम

अमळनेर-आमदार शिरीषदादा चौधरी मित्र आघाडी तर्फे  स्वीकृत नगरसेवक पदासाठी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते फिरोजखा पठाण यांचा अर्ज आज जळगाव जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या कडे दाखल करण्यात आला.
           नगरसेवक ऍड सुरेश सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते, प्रत्येक समाज बांधवांना संधी देण्याचं धोरण आ.शिरीष चौधरीं व डॉ रविंद्र चौधरी यांचे असल्याने त्या प्रमाणे मुस्लिम समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांचे नाव डॉ.रवींद्र  चौधरी,व  आमदार चौधरी यांनी निश्चित केले होते,त्यानुसार त्यांनी अर्ज दाखल केला.प्रसंगी न प चे गटनेते प्रवीण पाठक, मा. उपमहापौर कलीम सालार, बाळासाहेब सदांनशिव,सलीम टोपी, संतोष लोहरे,पंकज चौधरी, श्याम पाटील, किरण बागुल, धनंजय महाजन, नरेंद्र चौधरी,महेश जाधव, सुरेश सोनवणे, गुलाम नबी, जकीर मेवती, मुशीर शेख व समाज बांधव व आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवाराचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते..

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.