बहिणाबाईंच्या जन्मभूमितिल कन्येकड़े लागले साऱ्यांचे ध्यान
अमळनेर प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील कन्या आणि जळगाव जिल्ह्यातील सुन पोहचली "सुपरमॉम" च्या ग्रैंड फिनालेमधे. "हिंदी colours चैनलचा स्तुत्य उपक्रम . पुण्यात 21 july ला ग्रैंड फिनाले .
.
महाराष्ट्राची शान उज्वला दिनेश पाटील जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यावर असताना कधी मनात विचार आला नव्हता हि माझी कहाणी लिहायला संधी मिळणार हा जो काही मान मला मिळाला आहे त्याच्यामुळे मिळाला आहे मी त्यांची खूप आभारी आहे खास करून यशस्करंम असोसिएट एमडी तुहिन दास व त्यांच्या पत्नी तनुष्री दास या दोघांची सुपरमॉम भारतात पहिल्यांदाच होणार आहे आणि मी अभिमानाने सांगू इच्छिते की मी त्याची फायनल लिस्ट आहे 21 जुलैला पुण्यात *ग्रैंड फिनाले* आहे बघुया आता कुठ पर्यंत पोहोचते पण मी इथपर्यंत पोचली त्यात मी माझं अर्धे यश मिळाले असे मानते.
मी एक साधारण घरात जन्मलेली मुलगी खेडेगाव विंचूर . अतिशय संस्कारी घरात जन्मलेले माझे वडील शिक्षक होते. त्यामुळे आमचं संगोपन छान झाले वडील मुलींना लक्ष्मी चा दर्जा देणे त्यांनी आम्हाला त्यांचा कधीच पायाला हात लावून नमस्कार करायला दिला नाही लक्ष्मीने पायाला हात लावायचा नसतो असं त्यांच म्हणणे असायचे ते मला मुलगा समजायचे त्यांची मी खूप लाडकी व त्यांच्या जवळ राहणारी माझे तसे त्यांनी खूप लाड केले आम्ही तीन बहिणी पण आम्हाला कधीच साध ओरडले ले आठवत नाही. दोन भाऊ होते त्यांना भरपूर रागावले ओरडले पण मुलींना मात्र कधीही नाही .1991 ला माझं लग्न झालं दिनेश पाटील यांच्यासोबत त्यांनी मला खूप छान साथ दिली प्रोत्साहन दिले. अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करायला संधी दिली. माझा प्रवास पहिले मुलगी मग पत्नी आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे आई मग छान दोन गोंडस मुलं झाली .खूप छान संसाराला सुरुवात झाली. परिस्थिती तशी जेमतेम दोघेही मिळून मला जे जमेल ते छोटेमोठे उद्योग करून सासर माहेर सांभाळत असताना दिनेश यांना गोव्याला नवीन संधी मिळाली, मडगाव ला शिफ्ट झालो. मुलांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. तोपर्यंत अजून आयुष्यात नवीन चैलेंज आल. मला माझा जाऊबाई ने विचारले मला तुझ्याकडून मुल हवा आहे तू माझ्यासाठी करू शकशील का ? असं म्हटल्यावर मोठं आव्हान होतं माझ्यासाठी कारण माझे ऑपरेशन होते म्हणजे जरा अवघड होते, परंतु नाही म्हणणे माझ्या स्वभावात बसत नाही. परत तिसरा मुलगा झाला आणि माझ्यासोबत मी व माझ्या जाउला मातृत्व बहाल केले त्यांना पण *सुपरमॉम* बनवले ती वेळ फारच माझ्यासाठी अवघड होती कारण दोन महिन्याचं बाळ आईच्या दुधावर भूक भागवणारा
त्याला त्यांच्या हातात सुपूर्द करणे म्हणजे फार तारेवरची कसरत होती प्रसंग तसा फार अवघड होता शब्दात मला मांडता येणे शक्य नाही . आमचं पण आयुष्य इतकं साधं सोपं नव्हतं प्रत्येकाच्या आयुष्यात चढउताराचे प्रसंग येतात. तसं तेवढ्यात माझा तरुण भाऊ गेला नंतर वडील गेले मग आईचा कँसर .त्यानंतर माझे रिपोर्ट अर्ली स्टेज चे आले . परिवाराची फार ओढाताण झाली तोपर्यंत मुले हळूहळू मोठी झाली त्यांच शिक्षण सुरू झाले. आमचा पूर्ण पाठिंबा होता ज्या क्षेत्रात शिकायचे आहे त्यांना मात्र आमच लांबुन लक्ष होतं, पण त्यांच्या आवडीचं क्षेत्र असल्यामुळे त्यांनी नीट प्रगती केली आता ते पण हळूहळू सेटल होत आहेत. आता मी सध्या सोशल वर्क करते माझ्या आई ला 2007 मध्ये कैंसर झाला, त्यावेळी मी खूप असे पेशंट बघितले ही त्यांना खाण्या पिण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. ट्रीटमेंट तर बाजूला तेव्हापासून जेवढे जमेल तेवढे त्या लोकांना मदत करते त्यांच्यासाठी फंड जमा करते हॉस्पिटलला घेऊन जाते डॉक्टरांना भेट ते बोलते राहण्याची व्यवस्था करून देते अशी कामे करते . लोकांकडून पण मी पैशांची मदत मागते जेवढे देतील तेवढे पन्नास रुपयाची मदत सुद्धा फार मोठी होते .पेशंट चे
एक वेळ चे जेवण होते मला हा सुपरमॉम चा प्लेटफार्म मिळाला आहे तो फार मोठा आहे त्याच्यामुळे मला अजून लोक ओळखतील आणि अजून माझ्या कामाला हातभार लावतील म्हणून मी खूप आनंदी आहे मला माझ्या नवऱ्याची व मुलांची खूप मोठी साथ आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते
मी आता नव्याने आयुष्याची सुरुवात केली आहे आयुष्य खूप सुंदर आहे .फार महत्त्वाचा असतो माझ्या लहानपणी च्या गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या त्या मी आता पूर्ण करते आहे आहे योगा तर माझा छंद आहे मी डान्स व संगीत शिकते मला लहानपणापासून डान्स खूप आवडतो आयुष्यातल्या राहिलेल्या सगळ्या गोष्टी करते जीवनाचा आनंद घ्यायला शिकले आहे मुलांमुळे टे्कीग ला जायला लागली मला ट्रेकिंग फार आवडते हीमालयात जाऊन आले माझा लेख संपण्याच्या आधी मी सर्व मातांना एकच सांगेन सगळ्या माता या सुपर मोम असतात सगळ्या पर्सनॅलिटी युनिक असतात ते फक्त स्वतःला ओळखायला आलं पाहिजे स्वतावर विश्वास ठेवा अपेक्षा आपण कोण काय म्हणेल त्याच्याकडे लक्ष न देता तुम्हाला काय आवडतं तो छंद तुम्ही जोपासला पाहिजे व्यायाम केला पाहिजे चांगली पुस्तके वाचली पाहिजे पण हे असच जगावं आयुष्यात येणारा उद्याचा दिवस हा शेवटचाच आहे मग बघा आयुष्य किती सुंदर आहे ते मी मिलिंद पाटील साहेबांची पण आभारी आहे त्यांनी मला संधी दिली आणि तूहीन दास व तनुक्षौ यांचे पुनश्च आभारी आहे व माझे मित्र मैत्रिणी यांना एकच सांगू इच्छिते काय झालं ते सोडा आणी पुढे जा छान पॉझिटिव्ह जगावे....
उज्वला दिनेश पाटील
माहेर -विंचुर धुळे
सासर-चौबारी तालुका अमळनेर
हल्ली मुक्काम- गोरेगाव ,मुंबई