उपसभापती रवींद्र भोये यांनी वाढदिवसाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वह्यांचे केले वाटप.
सर्वत्र अभिनंदन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सामाजिक कार्याची आवड असलेला माणूस व कार्यात स्वतःला झोकून देणारे मानसिक दुर्मिळ होत चाललेले आहेत काही माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आपले समाधान मानत असतात असेच एक व्यक्तिमत्व उपसभापती रवींद्र भोये .
आपला वाढदिवसाचा गाजावाजा न करता आपण समाजाचे देणे लागतो ही भावना ठेवून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा शाखेच्या वतीने उपाध्यक्ष प्रवीण महाजन यांनी शाळेतील बालकांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम केले आहे उपसभापती भोये यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वह्या वाटून एक आगळावेगळा वाढदिवस साजरा केल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष पुर्व नाशिक प्रविण महाजन यांनी मा उपसभापती रवींद्र भोये यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने 500 विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले प्रसंगी प्रविण महाजन, उपसभापती रवींद्र भोये, संचालक भाऊसाहेब खांडबहाले, सतीश पाटील, शशिकांत भाऊ पवार, ललित केदारे, भरत भाऊ खोटरे,राजेंद्र अहिरे, मैत्री साहेब, कैलास बेंडकुळे....आदी