मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांचा हसत खेळत उपक्रम.
अमळनेर प्रतिनिधी-विद्यार्थ्यांना गणित व भूमिती या विषयाबद्दल अगोदरच भिती असते.त्या विषयातील शिक्षकांची अध्यापन पद्धती चांगली असेल तर विद्यार्थ्यांना त्या विषयाबद्दल आवड निर्माण होते.सानेगुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथील शाळेत दरवर्षी शिक्षक गणित विज्ञान, भाषा,समाजशास्त्र विषयात नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आवड निर्माण झाली आहे.
मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी इयत्ता आठवीच्या वर्गाला भूमिती विषयातील भौमितिक रचना याचे
अध्यापन करतांना चक्क डोक्याला बांधावयाचा रुमालांच्या साहयाने समांतर रेषा,छेदीका, स्पर्शिका,कोन या संकल्पना समजून घेतल्या.
विद्यार्थ्यांना आनंददायी अध्यापणामुळे गणितातल्या भूमितीतील संकल्पना लवकर समजतात व त्या विषयाबद्दल गोडी निर्माण होते हा यामागचा उद्देश असतो असे सानेगुरुजी कन्या स्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी सांगितले.