Halloween party ideas 2015


रायगड किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्याची मा.श्री. छगन भुजबळ साहेबांची मागणी

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना वेधले सरकारचे लक्ष

नाशिक प्रतिनिधी

रायगड किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्याची आग्रही मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.छगन भुजबळ साहेब यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाकडे केली आहे.* राज्यपालांच्या अभिभाषणात बोलतांना त्यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
यावेळी बोलतांना मा.श्री.छगन भुजबळ साहेब म्हणाले कि, रायगड जिल्ह्यापर्यंत चौपदरी रस्ता लवकरच तयार होईल. परदेशात अनेक जुने किल्ले आहेत. त्यांचे नुतनीकरण करून पूर्वीच्या काळी ते जसे असतील त्याप्रमाणे जतन केलेले असतात. गडकिल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने काही निधी ठेवल्याचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात आहे. त्यात अजून वाढ करून गड किल्यांचा विकास करण्याच्या कामावर आपण लक्ष दिले पाहिजे. काही इतिहासकार आणि तज्ञांना घेऊन रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाल कोठे असेल, घोड्यांचा पाग कोठे असेल, मार्केट कसे असेल किंवा मंदिर कसे असतील याची कल्पना करून रायगडचा विकास करावा. अशा पद्धतीने विकास केला तर माझी खात्री आहे की,चारपदरी रस्ता व्यवस्थित तयार झाल्यानंतर मुंबईहून अडीच तासामध्ये कोणीही रायगडावर पोहोचणे शक्य होईल. लोकांना रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज कोठे बसत होते. त्यांचा दरबार कोठे होता. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळतील. 
आज आपल्या भागातील सर्व किल्ले काही ठिकाणी ढासाळलेले आहेत.तर काही ठिकाणी मातीचे ढिगारे आहेत. आपण पुन्हा एकदा किल्ल्यांना पूर्वीचे रूप देऊ शकतो काय ? त्याकरिता तरतूद करण्यात आलेला निधी कारणीभूत लागला पाहिजे यासाठी चांगले दोन ते तीन तज्ञ निवडावेत. जेणेकरून महाराजांच्या काळातील रायगड किल्ला परत एकदा उभा राहिला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन तिथे झाले पाहिजे. हा किल्ला केंद्र शासनाच्या ताब्यात आहे. मागे आम्ही  दिल्ली येथे केंद्र सरकारच्या परवानगीसाठी गेलो होतो. आम्ही सांगितले होते कि, आम्ही या किल्ल्याचा विकास करू यासाठी हा किल्ला आमच्या ताब्यात यावा. पण ज्याअर्थी आपण त्या कामासाठी निधी ठेवला आहे, त्याअर्थी केंद्राच्या परवानगीने काम झाले असेल असे मला वाटते. त्या कामावर आपण जास्त लक्ष द्यावे आणि रायगड  किल्याचा विकास करावा.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.