Halloween party ideas 2015



अमळनेर नगरपरिषदेच्या सत्ताधारी (तिसरी आघाडी) नगरसेवकांचे जळोद डोहाजवळ तापी नदीच्या पाण्याचे जल पूजन.

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर शहरातील नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटातील बंडखोर तिसऱ्या आघाडीच्या नगरसेवकांनी प्रभागातील पाणी प्रश्नासाठी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनही दिले होते.पण वरूणराजा चांगला बरसल्याने नद्या नाले वाहू लागले,हतनुर धरणाच्या पाटया मोकळ्या करण्यात आल्या.आता तापी नदीत पाणी आल्याने अमळनेर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटेल.सर्व बंडखोर तिसऱ्या आघाडीच्या नगरसेवक यांनी तापीमायचे पुजन करण्यासाठी गेले.
         


दि.3~7~2019 रोजी सकाळी हतनूर धरणाचे 12 व रात्री 41 दरवाजे उघडले होते. त्यामुळे तापी नदीत मोठा प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन आपल्या अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जळोद डोहात सकाळी 3 वाजता पाणी पोहचले. तापी नदीचे जळोद डोहाजवळ जल पूजन करतांना नगरसेविका नूतन पाटील, महेश पाटील सोबत नगरसेवक सुरेश पाटील, प्रताप शिंपी, रवि पाटील, संजय (भूत बापू ) पाटील, संतोष पाटील, संजय भिल, साखरलाल महाजन, राजेंद्र यादव, संजय पवार व नगरपरिषद कर्मचारी इ. 

     आता खऱ्या अर्थाने अमळनेर शहराच्या विस्कळीत व बिकट झालेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.

देवाची करणी आणि तापी नदीला पाणी
 


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.