भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्यामुळे "नगरपालिका व महानगरपालिकेच्या शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू
मुंबई प्रतिनिधी
नगरपालिका व महानगरपालिकेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यात आला असून त्याबाबतचा शासन निर्णय काल शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला.
राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांना राज्य सरकारी कर्मचार्यांसोबत ७ वा वेतन आयोग मिळावा यासाठी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीने पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यामुळे प्रथमच शिक्षकांना वेळेवर ७ वा वेतन आयोग सुरू झाला.
तथापि नगरपालिका व महानगरपालिकेच्या शिक्षकांना मात्र लागू करण्यात आला नव्हता. या संदर्भात भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीने २२ फेब्रुवारी रोजीच शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. मागील आठवड्यात *भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा डॉ कल्पना पांडे, विदर्भ संयोजक उल्हास फडके व विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची* नागपूर येथे तर *भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे, अमरावती विभाग अध्यक्ष डॉ नितीन खर्चे, नाशिक विभाग अध्यक्ष महेश मुळे, पुणे विभाग अध्यक्ष बबनराव उकिर्डे, यांनी विधान भवनात शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट* घेऊन तातडीने वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्यामुळे शिक्षकांना वेतन आयोग लागू झाला असून अन्य विभागातील शिक्षकांनादेखील ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत भाजपा प्रदेश शिक्षक आघाडी पाठपुरावा करीत असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
फोटो