Halloween party ideas 2015


जलयुक्त अंतर्गत बंधाऱ्यांची नित्कृष्ठ कामे करून लाटला मलिदा

अमळनेर तालुक्यातील गैरव्यवहाराची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करा,

भाजप शहराध्यक्ष शितल देशमुख यांची मागणी,आंदोलनाचा इशारा

अमळनेर प्रतिनिधी

तालुक्यात जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत सिमेंट बंधाऱ्याची कामे अंत्यत नित्कृष्ठ दर्जाची झाली असून अनेक बंधाऱ्यांना पहिल्या पावसातच गळती लागली आहे,  सिमेंट बंधाऱ्यांसह बांध बंदिस्ती, खोलीकरण आदींची कामेहीनिकृष्ट दर्जाची झाली आहेत.केवळ बिले काढून मलिदा लाटण्यासाठीच ही कामे झाली असल्याचे स्पष्ट झाले असल्याने विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या आदेशानुसार अमळनेर तालुक्यातील जलयुक्त कामांच्या गैरव्यवहाराची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे अमळनेर शहराध्यक्ष शितल देशमुख यांनी केली आहे. 
              याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे,जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक गावांत जुने सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरणाच्या नावाने फक्‍त आजूबाजूला मातीचा भराव करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. ग्रामस्थानी काम सुरू असताना संबंधित अधिकारी, ठेकेदारास वारंवार निकृष्ट काम होत असल्याबाबत निदर्शनास आणून दिले होते. मात्र, तरीही त्यांनी हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले आहे.पिंगळवाडे येथे असाच प्रकार घडला असून सिमेंट बंधाऱ्याचे 4 लाख 32 हजार 486 रुपये (पहिला टप्पा), 2 लाख 5 हजार 355 रुपये (दुसरा टप्पा) व 6 लाख 37 हजार 841 रुपये (तिसरा टप्पा) एवढी रक्कम ठेकेदारास अदा करण्यात आली आहे. मात्र सुरवातीच्या अल्पशा पावसात बंधाऱ्यांस गळती लागून माती वाहून गेली आहे.विषेश म्हणजे याबाबत तेथील सरपंचा नी तक्रार केल्यानंतर माती टाकून डागडुजी करण्यात आली,प्रत्यक्षात हे काम देखील थातूर मातूर आणि चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप ग्रामस्थानी केला असल्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बंधाऱ्याची पाहणी करावी,व संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून ज्यांच्यामुळे पाणी अडविले गेले नाही त्यांना चाप बसेल.

कृषी विभागच होतोय बेदखल

जलयुक्‍त मोहिमेंतर्गत शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे.मात्र अमळनेर तालुक्यातील अमळगाव, पातोंडा, जानवे, मारवड, मांडळ, मुडी, जवखेडा आदींसह विविध गावातील कामेही निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत. ही सर्व जबाबदारी कृषी विभागाची असून, अधिकारी, कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करून आपणास काही देणेघेणे नाही व आपले काहीही बिघडणार नाही अशी भूमिका घेतली आहे.यामुळे तहसीलदारांनी  देखील लक्ष घालून या सर्व कामांची चौकशी करावी ही संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती आहे. 

ठेकेदार बनलेल्या कृषी सहाय्यकांची देखील चौकशी व्हावी

          अमळनेर येथील अनेक कृषी सहाय्यकांनीच तालुक्यातील जलयुक्‍तच्या कामांचे ठेके घेतल्याची  ओरड शेतकऱ्यांमध्ये असून काही कृषीसहाय्यकानी नातेवाइकांच्या नावाने ठेके घेऊन जेसीबी आदी माशीनरीचे आवास्तव बिल कृषी विभागाशी संगनमत करून लाटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे अशा कृषी सहाय्यकांची यादी तयार करून वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे.अशांची निकृष्ट कामांबाबत बिले रोखून कठोर शासन झालेच पाहिजे अशी अपेक्षा गोरगरीब तथा दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. 

जलयुक्तची एसीबी चौकशी केली

      राज्यातील जलयुक्त च्या कामाबाबत आलेल्या तक्रारीवरून या गैरव्यवहाराची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करण्यात येईल असे आदेश विधानसभा सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या पावसाळी अधिवेशनात दिले आहे,यानुसार जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी देखील सभापतीच्या निर्देशानुसार चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले आहे,यामुळे अमळनेर तालुक्यात त्वरित ही चौकशी करावी ही आग्रही मागणी असून यासंदर्भात जलसंधारण  मंत्री तसेच मुख्यमंत्र्याना निवेदन देणारे आहोत,शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नी आंदोलन उभे करण्याची तयारी असून गैरव्यवहार करणाऱ्या ठेकेदार कृषि सहायक व इतर अधिकाऱ्यांची नावे जनतेसमोर उघड करू असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.