गावात विद्यार्थ्यानी मिरवणुकीने वेधले लक्ष-----
अमळनेर प्रतिनिधी
राज्यात मागील तीन ते चार वर्षापासून सर्वत्र दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे. पुन्हा हरितक्रांती साठी वसंतराव नाईक यांची विचारधारा आपल्याला अंगिकारावी लागेल असे मत गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी वसंतनगर ता.पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रम शाळेत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोरख जाधव होते. तर गजमल जाधव,मनोज जाधव, अजमल जाधव,केळकर जाधव,कर्तार जाधव,पोलीस पाटील विलास जाधव,आत्माराम जाधव,अनार जाधव,अशोक जाधव,रविंद्र जाधव,विठ्ठल जाधव,जवाहरलाल जाधव,दलपत जाधव,संतोष जाधव,अभेराम नाईक, गोरख नाईक, बालू जाधव,एकनाथ जाधव, जगन जाधव,तोताराम जाधव,सरिचंद जाधव ,विनोद जाधव,भरत जाधव,सुकदेव जाधव, प्राचार्य डी. एम. पाटील ,मुख्याध्यापक सोपान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.जाधव पुढे म्हणाले की, वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना आमूलाग्र बदल करून कृषी क्रांती आणली होती. यावेळी वेद-मोक्ष मल्टीपर्पज फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन शेती उपयुक्त पुस्तके व झाडांची रोपे वाटप करण्यात आली.
*गावात मिरवणुकीने वेधले लक्ष----*
वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी विद्यार्थ्यानी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे बैनर, विद्यार्थ्यांच्या हातात झाडांची रोपे घेत ,झाडे लावा -झाडे जगवा, पाणी अडवा -पाणी जिरवा, कावळा म्हणतो काव, काव माणसा माणसा झाडे लाव अशा विविध घोषणानी गावातील प्रत्येक चौकात जनजागृती करण्यात आली. यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यानी ,प्रा.हिरालाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.एम आर सालुंखे यांनी सूत्रसंचालन तर पी.एच. निकुंभे यांनी आभार मानले.