नुतन विश्वस्थांची एक मताने निवड
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर : येथील क्षत्रिय फुल माळी समाजाची वार्षिक सहविचारी जनरल सभा दि.३रोजी समाज संस्थेच्या इमारतीत उत्साहात संपन्न झाली असून यावेळी नूतन विश्वस्थांची एक मताने निवड करण्यात आली.
दि.३ जुलै १८५१ रोजी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी पुण्यात पहिली शाळा काढून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून इतिहास घडवला म्हणून याच दिवशी सभेस विशेष महत्व प्राप्त झाले.सर्व प्रथम राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या विषयी माहिती देऊन संस्थेचे विश्वस्थ प्रविण बी.महाजन यांनी सर्व महापुरुषांना अभिवादन केले. यावेळी सर्वांच्या एकमताने पुढील पाच वर्षांसाठी विश्वस्थ म्हणून दिलीप आत्माराम पाटील(माळी)साहित्यिक गोकुळ गोविंदा बागुल,दिनेश भाऊराव माळी, नगरसेवक अँड.सुरेश सोनवणे,उदयकुमार खैरणार,अँड.नगराज माळी, प्रवीण बी.महाजन,खेमराज बोरसे,आर,एस.माळी,महेश पांडुरंग माळी विजय इच्छाराम माळी यांची निवड करण्यात आली तसेच संत सावता माळी पुण्यतिथी मोठ्या स्वरूपात साजरी करण्याचे ठरले असून विविध सामाजिक कार्येक्रम राबवण्या बाबत व समाज संघटन वाढवण्या संदर्भात चर्चा झाली सर्व साधारण सभेचे मागील प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले.यावेळी मोट्या प्रमाणावर समाज बांधव युवक बांधव उपस्थित होते.