Halloween party ideas 2015


लोकमान्य विद्यालय शाळा भरणार मंगळावर

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील लोकमान्य विद्यालय शाळा भरणार थेट मंगळावर. नासा नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्टरेशन चे  मंगळावर  “मंगळरोव्हर 2020“ हे अंतरीक्षयान लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणार्या मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे . या अंतरीक्ष यानावर स्टेन्सिल्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसर्या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. ही मोहीम मंगळ मोहिमेच्या प्रवासपर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीमेंतर्गत राबवत आहे.
       या उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची नावे नोदवण्यात आली. त्यांचे सदर उपक्रमाचे बोर्डिंग पासही उपलब्ध झाले.    
        यामुळे लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना एक चांगला अनुभव मिळाला आहे, या माध्यमातून विद्यार्थ्यांना मंगळ ग्रह व त्या ग्रहावरची नासाची सुरु असलेली मोहिम आणि पाठवले जाणारे "रोव्हर 2020" या अवकाश यानाची माहिती मिळाली.
     या उपक्रमासाठी विद्यालयाचे उपशिक्षक भूषण महाले यांनी परीश्रम घेतले त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रविंद्र लष्करे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.राजेंद्र निकुंभ व श्री.मनोहर महाजन उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.