स्वा.एस.एन.वाणी विदयालयाला इ लर्निंग, एल.इ.डी.लँबचे उद्धघाटन.
संगणकाचे ज्ञान हि आजच्या काळाजी गरज.
प्रविण महाजन
अध्यक्ष
युवक मित्र परिवार पुणे
अमळनेर प्रतिनिधी-सध्या संगणकाचे युग आहे. स्पर्धेत टिकायचं असेल तर संगणक ज्ञानाशिवाय पर्याय नाही.सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील पालकाचा कल मराठी शाळाकडे वाढला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येक शाळेत संगणक कक्ष असणे गरजेचे आहे. पर्यंत युवक मित्र परिवार पुणे यांच्यावतीने अनेक शाळांमध्ये पुस्तके व संगणक कक्ष उपलब्ध करून दिले आहेत याचे आम्हाला आमच्या संस्थेला समाधान आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील सर्व शाळांमधील विद्यार्थी संगणकाचे ज्ञान घेऊन एक परिपूर्ण विद्यार्थी तयार झाला पाहिजे हे स्वप्न साकार करण्याचा छोटासा प्रयत्न युवक मित्र परिवार पुणे या संस्थेच्या माध्यमातून साकार होतोय असे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी स्वर्गवासी एस.एन.वाणी माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथे ई लर्निंग लँबचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
स्वा.शिवराम नथु वाणी माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे येथे 'संगणक कक्ष' व 'इ लर्निंग एल.इ.डी लॅब 'चे उदघाटन......