Halloween party ideas 2015


पूर्व वैमनस्यातून भरत मराठेचा अशोक माळीवर चाकू हल्ला प्रकरणी अमळनेर न्यायालयाने दिली सात वर्षाची शिक्षा.
अमळनेर प्रतिनिधी- चोपडा येथे अंडाभुर्जी न दिल्याच्या कारणाचा राग मनात ठेऊन आरोपीने एकाला चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती .
याप्रकरणी आरोपीविरुद्ध चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचे
कामकाज न्यायालयात चालुन आज आरोपीला अमळनेर न्यायालयाचे न्या. राजीव पांडे यांनी सात वर्षांची शिक्षा
सुनावली. तसेच १ हजर रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, आरोपी बाळू उर्फ भरत भागवत मराठे रा. सिद्धिविनायक कॉलनी चोपडा
हा १ ऑक्टोबर २०१७ रोजी कॉलेज रोडवर रात्री ९ वाजेच्या सुमारास अशोक माळी यांनी त्याला अंडाभुर्जी खाऊ न
घातल्याने आरोपी भरत मराठे याने याचा राग मनात ठेवत ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अशोक माळी हे
घरी परतत असताना आरोपीने जुन्या वादातून अशोक माळी यांच्यावर चाकूने गळा, तोंड आणि कपाळावर वार करून
जखमी केले. तसेच आरोपीने जखमीला बांधून मोटारसायकलने ओढण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी
त्यांना सोडवत उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आरोपीला ३ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या खटल्याचे
कामकाज आमनेर न्यायालयात सुरु होते . तपासाधिकारी पोनी किसन नजन पाटील, पैरवी अधिकारी, पीडी भामरे,
पोकॉ काशिनाथ सोनवणे, यांच्या महत्वपूर्ण साक्षीमुळे न्यायालयाने आरोपी भरत मराठे याला दोषी ठरवून भादंवि
कलम ३०७ नुसार ७ वर्षांची शिक्षा १ हजार दंड आणि दंड न भरल्यास ६ महिन्यांची शिक्षा ,३२३ प्रमाणे ५०० रुपये दंड न भरल्यास १५ दिवस शिक्षा , ३४१ प्रमाणे एक महिना व ५००
रुपये दंड,दंड न भरल्यास १५ दिवस शिक्षा देण्यात आली. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. सरकारतर्फे १०
साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे किशोर बागुल,मंगरूळकर यांनी कामकाज पाहिले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.