पोलिसात प्रतिकूल परिस्थितीत
समस्येवर मात करण्याची ताकद -
कै गिरीश पाटील ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नाशिक प्रतिनिधी(समाधान पाटील)
पोलीस हा चांगला समाजसुधारक शिक्षक समन्वयक चांगला प्रशासक धीर देणारा राजकारणी न्यायाधीश बनू शकतो ----
समाज मात्र त्याचाकडून अगदी सुपरमेँन सारखी अपेक्षा करतो.फ़ोन लावला की दुसऱ्या मिनिटाला पोलीस आले पाहिजे ,फिर्याद दिली की सत्वर विना विलंब कार्यवाही झाली पाहिजे .पोलिसांन जवळ काही जादूची कांडी नाही ,की फिरवली म्हणजे जादूगाराच्या काचेच्या गोलात चोरी करणारा दिसेल आणि आजकल संशयित सी.सी .टी .व्ही .मध्ये दिसला तरी या 125 कोटी जनसंख्येमध्ये शोधायला वेळ लागणारच़ शिवाय पोलिसाच्या कामामध्ये अनेक अडचणी असतात .वेगवेगळ्या प्रकारची कामे त्यांना करावी लागतात .त्यामध्ये अति विशिष्ट लोकांचा सुरक्षा बंदोबस्त भारत देशातील अति उत्साहपणे सन उत्सह साजरा करण्याऱ्या उत्साहप्रिय लोकांचा सणाचे बंदोबस्त करने या सारख्या अनेक बाबीमुळे अडथळे येतात .
पोलिसांच्या रात्रदिवस कर्तव्यावर हजर राहुन आपल्या परिवाराकडे व शारीरिक क्षमतेकडे दुर्लक्ष कराय़चे .प्रकूती अस्वास्थ जाणवले की एखादि पेन किलर गोळी खायची आणि पुन्हा सदरक्षणाय खल निग्रहणायसाठी तत्पर व्हायचे .पारिवारिक सुख दुःख असले तरी कुठल्याही कारणावरून बंदोबस्त लागतो .साप्ताहिक सुटी बंदचा फतवा निघतो व कर्तव्यावर हजर रहायचे लागते .असाच काहीसा पोलीस प्रवास सुरू असतो .या धावपळीत कधी ह्दयाचा ठोका चुकतो .आणि परिवार पोरका होतो हें कळतच नाही .
पोलिसांवर नियमित पडणारा कामाचा ताण कुटुंबी समेयत मिळणारा कमित कमी वेळ दैनंदिन कामा दरम्यान संबद्व येतं असलेले समजातील समाजकंटक गुन्हेगार समाजामध्ये सध्या सुरू असलेली लवकर श्रीमत होण्याची धावपळ या सर्व बाबीच्या पोलीस दलावरही परिणाम होत असतो .शिवाय समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये जशी चांगल्या वाईट प्रव्रूत्ती आहेत .तशा चांगल्या वाईट प्रवृत्त्तीचे लोकं पोलीस दलातदेखील आहेत .या वाईट प्रवृत्त्ती पोलीस दलात येण्याचे कारण देखील समाजच आहे .पोलीस आणि समाजामध्ये अंतर कमी करण्यासाठी ही दरी मिटवण्यासाठी पोलीस दलाकडून विविध कार्यक्रम घेतले जातात .
य़ामध्ये पोलीस मित्र बनवणे पोलीस आणि जनता संबद्व सुधारणे शांतता मोहल्ला कमिटी स्थापन करणे वैगेरे परंतु दुर्दैवाने दोन्ही कडून याचे प्रामाणिक प्रयत्न होताना दिसतं नाही .कारण शांतता कमिटी मधील बहुसंख्य सदस्याचा समजावर पडता नसतो .किंवा ते राजकीय तरी असतात .
पोलीस मित्र बनण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील चांगले नागरिक स्वतः हून पुढे येतांना दिसतं नाहीत व पोलीस दलाकडूनही त्याची चाचपणी होताना दिसतं नाही .पोलिसांनी आयोजित कार्यक्रमाना समजातील सर्व स्थरातील लोकांची उपस्तिती नगण्य असते .उदाहरण द्यायचे झाले तर 21 आक्टोबर या पोलीस शहीददिनी देशभरातील हुतात्मा झालेल्या पोलिसांना श्रद्धाजली अर्पण केली जाते .परंतु विशेष निमंत्रण पत्रिका देऊनदेखील या शूर शहिदांनसाठी दिवसाचा एक तास देण्याची तसदी कोणी घेत नाही .
पोलिसाबद्दल सर्वसामान्य जनतेत आदराचे आणि विश्वासाचे स्थान आहे व धाकही आहे .पोलीस विभागातर्फे पोलीस व नागरिकांमध्ये परस्पर विश्वासाचे व सामजस्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी विविध समारंभाचे आयोजक झाले .त्यात जनतेच्या सहभाग वाढला तर मैत्रीचे नाते वाढू शकते .पोलिसांनवरील कामाचा ताणही कमी झाला पाहिजे .सामान्य लोकांन प्रमाणे त्यांना कुटुंबाला वेळ देता येतं नाही .सण समारंभ नातेवाईक या जिव्हाळाच्या विषयांवरून ते दूर असतात .तेव्हा ते कर्तव्य बजवीत असतात .समाजाने ह्या त्यांचा कर्तव्याचे भाग ठेवणे आवश्यक आहे .पोलिसांबद्दल सर्वसामान्य जनतेत आदराचे आणि विश्वासाचे स्थान आहे व धाक आहे .----------