- आण्णा हजारे
(जेष्ठ समाजसेवक)
राळेगण सिद्धी- समाजकार्य करत राहणे,आपल्याच कार्यातुन आपल्याला प्रेरणा मिळत असते,पुढे कार्य करण्यासाठी तीच उर्जा उपयोगी पडत असते.कुठलेही कार्य असो ते लोकान्भीमुख असावे., ज्याप्रमाणे महात्मा फुलेंनी लिहुन ठेवलेल्या शेतकर्यांचा आसुड व गुलामगिरी या ग्रंथाबरोबरच त्यांनी केलेल्या कार्याचा ,विचारांचा तसेच शैक्षणिक क्रांतीचा उपयोग सध्याच्या पीढीबरोबरच पुढील कित्येक पिढ्यांनाही होनार असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केले.
श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य व खेच फ़ाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भुषण,लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी राळेगण सिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली असता आण्णा हजारे यांना महात्मा फुलेंनी लिहीलेले शेतकर्यांचा आसुड व गुलामगिरी हे ग्रंथ अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी भेट दिले.
यावेळी सचिन गुलदगड यांनी आण्णा हजारे यांना संघाने केलेल्या गेली १३ ते १४ वर्षातील महाराष्ट्र भर चालु असलेल्या कार्याची माहीती दिली.श्री संत श्रेष्ठ सावता महाराज यांची जन्मभूमि 'अरण' या धार्मिक क्षेत्रास तिर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा मिळावा , फुले दाम्पत्यास 'भारतरत्न' पुरस्कार मिळावा , भारतातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेस सावीत्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे , जिजाऊ सृष्टी प्रमाणेच सावित्रीबाई फुले सृष्टी प्रकल्प उभारावा,११ मे हा दिवस प्रशासकीय स्तरावर 'महात्मा दिन' म्हणुन साजरा व्हावा, संत सावता महाराजांची तसेच फुले दाम्पत्याची प्रतिमा असलेले भारतीय चलन प्रकाशित करण्यात यावे, आदिंसह समाजातील विवीध प्रश्नांवर करण्यात आलेल्या आंदोलनाविषयी चर्चा केली व या सर्व मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंन्द्रजी फडणवीस यांना भेटुन यासंदर्भात वेळोवेळी निवेदने दिली असल्याची माहिती आण्णा हजारे यांना दिली.
यावेळी संघाचे राज्य सचिव सुनिलजी गुलदगड,विभागिय अध्यक्ष कैलासराव शिंदे, वनश्री पुरस्कार प्राप्त जनाबापु मेहेत्रे, गिरीष सुर्यवंशी आदिंचा शिष्ठमंडळात सहभाग होता.