20 ऑगस्ट ला शिक्षक भरतीचा राज्यव्यापी संप.
अमळनेर प्रतिनिधी
- काय आहेत मागण्या
* जुनी पेन्शन योजना सुरु करावी
* 02 लाख रिक्त पदे तातडीने भरावीत
* अनुकंपा नियुक्त्या द्याव्यात.
* 7 वेतन आयोगात केंद्र प्रमाणे भत्त्यांचे दर निश्चित करावेत
* महिला कर्मचाऱ्यांना केंद्र प्रमाणे 02 वर्षाची बाळ संगोपन रजा द्यावी
* सेवा निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे
* वारसा हक्क विना अट द्यावेत.
जळगाव दि.२९ जुलै २०१९- विविध मागण्यांसाठी 20 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याचे मुंबईत झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुढाकाराने समन्वय समितीच्या बैठकीत 64 संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आल्याचे नारायण वाघ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव यांनी कळविले आहे.
यावेळी अंशदायी पेन्शन योजना बंद करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरकारी विविध खात्यांमधील दोन लाख पदे तातडीने भरावीत, पाच दिवसांचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय विनाविलंब 60 वर्षे करावे, केंद्रासमान वाहतूक आणि शैक्षणिक भत्ता मिळावा, बक्षी समितीचा खंड 2 तातडीने प्रसिद्ध करावा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, महिला कर्मचाऱ्यांना 02 वर्षे बालसंगोपन रजा मिळावी, खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करावे आदी मागण्यांसाठी *शिक्षक भारती* शासन मान्यताप्राप्त शिक्षक दि.20 ऑगस्ट रोजी लाक्षणिक संप करणार आहेत.
चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वारसा, अनुकंपा विना अट करा, कंत्राटीकरण बंद करून तात्काळ सरळ सेवा भरती करावी. राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर आणि महामंडळाचे 17 लक्ष कर्मचारी संपावर जाणार आहेत. शासनाचे संपची दाखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
समविचारी संघटनांनी मोठे संख्येने सहभागी होण्याचे आव्हान शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी नारायण वाघ,सोमनाथ पाटील, आर.जे. पाटील, दिलीप तेली, विजय सोनवणे,चंद्रकांत देशमुख,भावेश अहिरराव,सागर सोमवंशी, विलास पाटील, संजय पाटील, परिमल पाटील,संजय वानखेडे,दिपक आर्डे यांनी केले आहे.