साहेबराव हिम्मतराव पाटील युवा मंच व साहेबा फाउंडेशन यांचा ज्ञान प्रसाराचा अभिनव.
प्रतिनिधी (अमळनेर ) : येथील माजी पोलीस आयुक्त (IPS) श्री . साहेबराव हिम्मतराव पाटील युवा मंच व साहेबा फाउंडेशन आयोजित यशपंढरी स्पर्धापरीक्षा केंद्र अमळनेर यांच्या सहकार्यानेदि. २८ जुलै रोजी भव्य तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा भरविली होती. या स्पर्धेला अमळनेर
शहर व अमळनेर तालुक्यातुन प्रचंड विद्यार्थी वर्गाची /इच्छुकांची गर्दी दिसून आली . या स्पर्धेस विद्यार्थी वर्ग सोडून इतर अनेकांनी उत्साहाने प्रचंड प्रतिसाद नोंदविला. या स्पर्धेसाठी सुमारे २०००
विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . या स्पर्धेत परीक्षेचे स्वरूप गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान मराठी व्याकरण ,इंग्रजी व्याकरणांसह १०० गुणांचे होते . या परीक्षेला माजी पोलीस आयुक्त(IPS ) श्री . साहेबराव हिम्मतराव पाटील युवा मंच व साहेबा फाउंडेशन तर्फे प्रथम
(५५५५ रु.) ,द्वितीय(३३३३ रु.) , तृतीय (२२२२ रु.) बक्षिस ठेवण्यात आले होते. या स्पर्धेला युवकांचा गर्दीचा प्रतिसाद पाहून भविष्यात याहुन मोठ्या स्पर्धांचे आयोजन युवा मंच करेल . वअमळनेर शहर / अमळनेर तालुकयातील युवकांना यापुढे महाराष्ट्रातील saic पॅटर्नशी असलेली संस्था याचे दालन खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन पिढीला स्पर्धा परीक्षा व क्षमता चाचण्या भविष्यात सोप्या पद्धतीने मांडणे आमचे उद्दिष्टं आहे ,असे आवाहन खुद्द माजी पोलीसआयुक्त (IPS ) श्री . साहेबराव हिम्मतराव पाटील यांनी केले आहे . विद्यार्थी हा गाव ते देशपातळीवर घेऊन जाण्याचे आमचे प्रथम उद्दिष्टं असुन देशाचा सर्वांगीण विकास हा आजचा तरुण वर्गच करू शकतो. म्हणून पुढील भविष्य काळात तरुण वर्गाने अशा स्पर्धा परीक्षांना सज्ज होऊन युवा मंच च्या उपक्रमास प्रतिसाद द्यावा असे आवाहन पाटील साहेंबानी केले. ही स्पर्धा
यशपंढरी पुस्तकालय व यशपंढरी अकादमी अमळनेर येथे संपन्न झाली . या स्पर्धेस यशपंढरी पुस्तकालय व यशपंढरी अकादमी संचालक श्री. पवन लोहार सर व आशुतोष निकम सर यांचे बहुमोल सहकार्य लाभले .