आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने तीन कोटींच्या निधीस मंजुरी,खापरखेडा येथे देवमढी व ग्रा प इमारतीचे भूमिपूजन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील कार्यसम्राट आ.शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातून अमळनेर मतदार संघात अनेक गावांमध्ये आदिवासी देवमढी साकारली जाणार असून यासाठी सुमारे तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्येकी 6 लाख निधीतुन अनेक गावातील आदीवासी वस्तीत ही देवमढी साकारली जाणार आहे.
अमळनेर मतदार संघातील खापरखेडा येथे पहिल्या देवमधीचे भूमिपूजन करण्यात आले,यासोबतच आ शिरीष चौधरींच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ग्रामपंचायत इमारतीचेही भूमिपूजन याप्रसंगी करण्यात आले.यावेळी खापरखेडा सरपंच सतीश पाटील, विश्वास सोनवणे (महाराज),उपसरपंच करणखेडा गणेश गुरव, गुलाब पाटील,धारसिंग पवार,अशोक सोनवणे,राजेंद्र पाटील,पंकज धनगर, सुधीर चौधरी,राकेश पाटील, संदीप पाटील, योगेश पाटील,शालिक पवार,नाना पवार पोलीस पाटील,किरण पवार,गजमल वाघ,काशीनाथ पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदार संघातील या गावात होणार नवीन आदिवासी देवमढी
झाडी,भरवस,आर्डी, खापरखेडा,करणखेडा,जवखेडा,वासरे,पाडसे,नींब,कळंबे,चोंदी-बोदर्डे,शहापूर,हिंगोणसीम,खेडी व्यवहारदाळे, मुंगसे,एकरुखी,निमझरी,दापोरीखु,लडगाव,मुडी-हिंगोने,ढेकू खु,ढेकू,कामतवाडी,देवळी, पिपळे खु, आंबासन,चिमनपुरी,वावडे,चोपडाई, जानवे,धानोरा,बोरगाव,शेळावे,शिरसोदे, वंजारी खु, धाबे, तांबोळे, सान्नी,हिंगोने बु,जामदे, इंधवे,महाळपुर,पुनगाव,पिपळकोठा, पिपळभैरव,दळवेल,दहिगाव.सदर मंजुरी बद्दल सर्व गावांच्या ग्रामस्थानी आ शिरीष चौधरी यांचे आभार व्यक्त केले आहेत.
फोटो