Halloween party ideas 2015


अमळनेर च्या न्यू व्हीजन स्कूल ने घडविले प्रतिपंढरपुराचे दर्शन

अमळनेर प्रतिनिधी

     न्यु व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे  सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशी  चे औचित्य साधून वारकरी च्या वेशात  सर्व बाल गोपाळ,संत सखाराम महाराज वाडी संस्थानाकडे लहान चिमुकल्यांचे दिंडीचे प्रस्थान होत असते या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून वाडी संस्थानात प्रति पंढरपुराचे स्वरूप प्राप्त होते. लहान चिमुकले वाडी संस्थानाच्या प्रांगणात रिंगण घालुन विठू नामाचा गजर करीत असतात. त्या रिंगणात  माऊलीच्या घोड्याचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील पालक व प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतो .
   या दिंडी सोहळ्याचे उद्घाटन चेअरमन श्री निलेश लांडगे व सौ अश्विनी लांडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी  उपाध्यक्ष धनराज महाजन,  सचिव गोकुळ पाटील, मुख्याध्यापक संदीप महाजन शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते .
      
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष शीतल देशमुख यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले 
   तसेच या कार्यक्रमा साठी  क्रीडाशिक्षक सॅम शिंगाणे सर , कला शिक्षक,तसेच नीता जाधव,दिपाली पाटील,फरीन शेख,सुचेता शिरसाठ,कल्पना कोरानी,वंदना मराठे,रितिका मार्कंडेय,सायली सोनार,स्नेहा एकतारे,हेमांगी काळकर,विद्या महाले,कामिनी महाजन,योगिनी ओवे,शितल निकम,
   किरण सोनार, सुरभी सोनवणे,राजश्री चौधरी, दिपाली राजपूत, आरती ढोले,वंदना शहा,   कविता शिसोदे,चित्रा बडगुजर,
विद्या पाटील,प्रियांका सोनवणे,नायरा सैनानी यांनी मोलाचे सहकार्य केले.
   तसेच शिक्षकेतर  कर्मचारी अनिता पाटील, वंदना सोनार, माधुरी बाळापुरे, माधुरी सोनार, प्रतिभा पाटील, दिपाली पाटील, पंढरीनाथ बाबा , रमेश नाना यांचे विशेष सहयोग लाभले .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.