Halloween party ideas 2015


सुन्नी दारूल कजा या संस्थेला आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सन्मानित.

       अमळनेर  ( प्रतिनिधि ) शहरातील फैजाने चिशतिया बहुउद्देशीय संस्था संचालित सुन्नी दारूल कजा या सामाजिक संस्थेला आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार च्या वतीने सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले 
          आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार च्या तर्फे आयोजित प्राविण्य प्राप्त मान्यवरांच्या गुणगौरव सोहळा नुकतेच न पा नाट्यगृहात संपन्न झाले या कार्यक्रमात फैजाने चिशतिया बहुउद्देशीय संस्था संचालित सुन्नी दारूल कजा ने  तंटामुक्ती व सामाजिक कार्य उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार च्या वतीने सन्मान पत्र देऊन आमदार शिरीष दादा चौधरी व हिरा गृप चे प्रमुख डाँ रविंद्र चौधरी सह आदि मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी सुन्नी दारूल कजा चे संचालक हाजी अब्दुल कादर जनाब अखलाख शेख मकतब लायब्रेरीचे अध्यक्ष मसुदखा मिस्तरी सह आदि बांधव उपस्थित होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.