Halloween party ideas 2015


समाजसेवेचे व्रत हे शिक्षकीपेशातुनच घडते- आमदार शिरीष चौधरी

पारोळा प्रतिनिधी

विद्यार्थी घडविताना समाज घडविन्याचे कार्य शिक्षक करतो.आणि त्यातूनच समाजात नैतिक मूल्य ,संस्कार, आणि आचार विचारांची रुजवण  ही घडत असते.त्यामुळे खरी समाजसेवा ही शिक्षकी पेशातूनच घडून येते.असे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी बहादरपुर ता.पारोला  येथे वसंतनगर येथील उपशिक्षक श्री बी.जी .चौधरी सर छत्तीस वर्ष सेवा झाल्यावर  सेवा निवृत्त झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
       यावेळी वसंतनगर  येथील माजी सरपंच  दलपत जाधव हे अध्यक्षस्थानी होते.तर आमदार शिरीष चौधरी , गटविकास अधिकारी सुभाष जाधव ,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक डी जी चौधरी,शिवभक्त के बी रणधीर, डी जी बोरसे , पारोला पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, सरपंच चंद्रकांत जावरे, प्राचार्य डी एम पाटील, मुख्याध्यापक सोपान पाटील,अहीराणी कवी संजय अमृतकर , नूतन शिक्षण संस्थेचे माजी अद्यक्ष एन के वैद्य ,सेवा निवृत्त  प्राचार्य बी एस भावसार,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रवीण पाटील, मनोज  चौधरी,अशोक जाधव,रविंद्र जाधव, माजी सरपंच भिकनराव चौधरी, सोमनाथ चौधरी,पोलिसपाटील विलास जाधव ,प्रभु जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी श्री बी जी  चौधरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. 
गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश चौधरी,सूत्रसंचालन प्रा.हिरालाल पाटील, श्री पी एच निकुंभे यांनी आभार मानले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.